कोरोनाबाधिताच्या मृत्यूमुळे संगमनेरमध्ये डाॅक्टरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Doctors beaten to death in Sangamner | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोनाबाधिताच्या मृत्यूमुळे संगमनेरमध्ये डाॅक्टरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

आनंद गायकवाड
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

नातेवाइकांनी डॉ. स्वप्नील भालके (रा. गुंजाळवाडी) व डॉ. जगदीश वाबळे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. डॉ. भालके यांचा मोबाईल हिसकावून घेतला.

संगमनेर : कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाइकांनी घुलेवाडी येथील संजीवन रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालय प्रशासन व नातेवाइकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. याबाबत परस्परविरोधी फिर्यादींवरून संगमनेर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील 25 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, घुलेवाडी येथील संजीवन रुग्णालयात कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचे काल (मंगळवारी) रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. कृत्रिम श्वसनयंत्रणा बंद केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाइकांनी डॉ. स्वप्नील भालके (रा. गुंजाळवाडी) व डॉ. जगदीश वाबळे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. डॉ. भालके यांचा मोबाईल हिसकावून घेतला. काहींनी रुग्णालयात तोडफोड केली. याबाबत डॉ. भालके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात मारहाण, तोडफोड व दंगलीचा गुन्हा दाखल केला. 

मृत रुग्णाचे नातेवाईक समीर शेख (रा. हसनापूर, ता. राहाता) यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. जगदीश वाबळे यांनी रुग्णाचा मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी नातेवाइकांना दीड लाख रुपये बिल भरण्यास सांगून आम्हाला रुग्णालयाबाहेर काढले. 

नंतर 10-15 जणांचा जमाव जमवून शेख व इतरांना लाकडी दांडके व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. शेख यांच्या जीपचे मोठे नुकसान केले. त्यानुसार, डॉ. वाबळे यांच्यासह अन्य दहा ते पंधरा जणांविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख