जिल्हा बॅंक निवडणूक : कर्डिले, घुले, मुरकुटे, अभंग रिंगणात  - District Bank Election: Kardile, Ghule, Murkute, Abhang in the arena | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंक निवडणूक : कर्डिले, घुले, मुरकुटे, अभंग रिंगणात 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

जिल्हा बॅंकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात आज 184 उमेदवारी अर्जांची विक्री झालेली असून, अनेक दिग्गजनांनी आपले अर्ज दाखल केलेले आहे.

नगर : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात आज (शुक्रवारी) एकूण 164 अर्जांची विक्री झालेली आहे. दिवसभरात माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग आदी दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. 

जिल्हा बॅंकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवसभरात आज 184 उमेदवारी अर्जांची विक्री झालेली असून, अनेक दिग्गजनांनी आपले अर्ज दाखल केलेले आहे. यामध्ये काहींनी सर्वसाधारण मतदारसंघासह बिगरशेती, इतरमागासवर्गामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. दिवसभरात अकोले, जामखेड, संगमनेर, नेवासे या तीन मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे. दिवसभरात इतरमागास वर्गामध्ये सर्वाधिक दहा उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून, त्याखालोखा शेतीपूरकमध्ये आठ जणांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. दरम्यान, या बॅंकेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेले आकडेवारी -
कर्जत - कैलास शेवाळे, नगर - शिवाजी कर्डिले (पाच), पदमावती म्हस्के, पारनेर - नीलेश लंके (दोन), उदय शेळके, सुजित पाटील, पाथर्डी - मोनिका राजळे (दोन), मथुराबाई वाघ, राहाता - अण्णासाहेब म्हस्के (दोन), राहुरी - अरुण तनपुरे, सुरेश बानकर, तानाजी धसाळ, शेवगाव - चंद्रशेखर घुले (दोन), श्रीगोंदे - राजेंद्र नागवडे, श्रीरामपूर - भानुदास मुरकुटे (दोन), दीपक पटारे (दोन). शेतीपूरक - मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, रावसाहेब शेळके (दोन), तानाजी धसाळ, सुरेश पठारे, राजेंद्र नागवडे (दोन), गणपत सांगळे. बिगरशेती - मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रवींद्र बोरावके, शामराव निमसे, शिवाजी डौले, पांडुरंग अभंग, सुवर्णा सोनवणे, सचिव गुजर. महिला राखवी - आशा तापकिर, जयश्री औटी, सुप्रिया पाटील, पदमावती म्हस्के, सुवर्णा सोनवणे. अनुजाती-जमाती - नंदकुमार डोळस. इतर मागास वर्ग - काकासाहेब तापकीर (दोन), भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, सुरेश करपे, रवींद्र बोरावके, पांडुरंग अभंग, भगवान फुलसौंदर, अनिल शिरसाठ, तानाजी धसाळ, कैलास शेवाळे, दीपक पटारे, केशव बेरड, सचिन गुजर, अरुण पानसंबळ. विमुक्त जाती-भटक्‍या जमाती - अशिष बिडगर, अभय आव्हाड, गणपत सांगळे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख