आमदार विखे पाटील, आशुतोष काळे यांच्याशी चर्चा झाली, अन जयंत पाटलांनी हिरवा कंदिल दिला - Discussions were held with MLAs Vikhe Patil and Ashutosh Kale, and Jayant Patil gave the green light | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार विखे पाटील, आशुतोष काळे यांच्याशी चर्चा झाली, अन जयंत पाटलांनी हिरवा कंदिल दिला

सतीश वैजापूरकर
बुधवार, 7 एप्रिल 2021

ऑनलाईन बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही या नियोजनास हिरवा कंदील दाखविला.

शिर्डी : गोदावरी कालव्यांतून 15 एप्रिल रोजी शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. एका पाठोपाठ एक दोन आवर्तने देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत चर्चा केली.

आज पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही या नियोजनास हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. 

दरम्यान, तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने मराठवाड्याकडे जाणाऱ्या जलद कालव्याला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला. त्यामुळे आता जलद व गोदावरी कालव्यांत एकाचवेळी पाणी सोडले जाईल.

योग्य नियोजन झाले, तर जलद कालव्यांना पाणी सुटेपर्यंत होणारा सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचा नाश त्यांच्या नावे नोंदता येईल. पाण्याची तूट असलेल्या गोदावरी कालव्यांसाठी अर्धा टीएमसी पाण्याची बचत होऊ शकेल. 

गोदावरी कालव्यांसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यातून दोन आवर्तने सहज पूर्ण होतील. मात्र उन्हाळ्यातील हे पहिले आवर्तन पंधरा दिवसांपूर्वी सोडले असते, तर बारमही पिकांना त्याचा मोठा फायदा झाला असता. आता पहिले आवर्तन 15 एप्रिल ते 15 मे आणि दुसरे आवर्तन 15 मे ते 15 जून या कालावधित होईल.

हा कालावधी पंधरा दिवसांनी अलीकडे आणणे सहज शक्‍य होते. सध्या तापमान वाढल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हे उन्हाळी आवर्तन वेळेवर मिळाले असते, तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता. 

हेही वाचा...

लख्ख प्रकाशामुळे समोरच्या वाहनधारकांची होते अडचण

पोहेगाव : विजेची बचत होण्यासाठी घरात व कार्यालयात एलईडी दिव्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. घरात व कार्यालयामध्ये याचा फायदा होत आहे मात्र अनेकांनी अगदी हलक्या प्रतीचे एल ई डी दिवे बाजारातुन घेउन दुचाकींना बसवले आहेत, हे दिवे अतिशय प्रकाशमान असल्याने समोरच्या येणाऱ्या वाहनाला या दिव्यामुळे पुढे काहीच दिसत नाही. त्यामुळे आजपर्यत अनेक अपघात झाले आहेत.

दिवे लावणा-या वाहनांच्या चुकीच्या प्रकाशामुळे मात्र अनेकांच्या जिवनात अंधार आला आहे. शहरांत आणि ग्रामीण भागात दुचाकीला सर्रास अत्यंत प्रकाशमय दिवे बसवले जात आहे. या प्रकाशामुळे जरी दुचाकीचे आकर्षण वाढत असले तरी, ते रस्त्याने चालेल्या इतर वाहन चालकांचा होणाऱ्या अपघातातुन मृत्यू ,अपंगत्व यातून त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे जीवन मात्र अंधःकारमय करण्यास कारणीभूत ठरत आहे. मात्र याकडे परिवहन विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख