`संकटमोचकां`ची शिष्टाई फेल ! अण्णा हजारे उपोषणावर ठाम - Discipline of 'troublemakers' fails! Anna Hazare insists on fasting | Politics Marathi News - Sarkarnama

`संकटमोचकां`ची शिष्टाई फेल ! अण्णा हजारे उपोषणावर ठाम

एकनाथ भालेकर
गुरुवार, 28 जानेवारी 2021

स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासह इतर शेतक-यांच्या मागण्यांबाबत सादर केलेल्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय कृषीमंत्री तोमर यांचे लेखी पत्र आधी आणले होते.

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी सादर केलेल्या मसुद्यावर बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या बैठकीतील मसुदा घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी (ता. २८ ) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे सकाळी भेट घेऊन एक तास चर्चा केली. त्या मसुद्याचा अभ्यास करून हजारे केंद्राला पु्न्हा सुधारीत मसुदा आज सायंकाळी पाठविणार आहेत. त्यावर जर सरकारचे समाधानकारक उत्तर आले, तर काय करायचे ते पाहू. सध्या उपोषण आंदोलनावर ठाम आहे. त्यात बदल नाही, असे  हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

हजारे म्हणाले, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी यासह इतर शेतक-यांच्या मागण्यांबाबत सादर केलेल्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय कृषीमंत्री तोमर यांचे लेखी पत्र आधी आणले होते. ते आमच्या अपेक्षापुर्तीचे नव्हते तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते. आम्ही सादर केलेल्या मसुद्यावर काल बुधवारी ( २७ ) नवी दिल्ली येथे केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी वरिष्ठांसोबत तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीतील मसुदा घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन आले होते. त्याचा आपण अभ्यास करीत आहोत. तसेच तज्ञ कार्यकर्त्यांकडून हा मसुदा तपासून घेतला जाईल. त्याच्यात दुरूस्ती करून सुधारीत मसुदा आज सायंकाळी केंद्र सरकारला पाठविणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी अपेक्षा पूर्ती होत नसल्याने ता. ३० जानेवारीपासून उपोषणावर ठाम आहे. त्यावर केंद्राचे समाधारक उत्तर आले तर काय निर्णय घ्यायचा तो पाहू, असे हजारे यांनी सांगितले.

 

हेही वाचा...

बांधिलकी सोशल फाउंडेशनतर्फे डिकसळमध्ये सामाजिक उपक्रम 

पारनेर : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून डिकसळमधील तरुणांनी एकत्र येऊन बांधिलकी सोशल फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा चंग बांधला. या उपक्रमाची सुरवातच त्यांनी गावात स्वच्छता अभियान राबवून केली. त्यांनी शाळा व मुलांसाठी लागणारे विविध शैक्षणिक साहित्य भेट दिले. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचाराचा वारसा घेऊन त्यांनी आगामी काळात काम करण्याचे ठरविले आहे. या सामाजिक कामात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता गावातील गोरगरिबांना मदत करणे, तसेच गावाच्या विकासासाठी पर्यावरणसमृद्धी, ग्रामस्वच्छता अभियान, गावातील विविध भागांचे सुशोभीकरण, वृक्षलागवड व ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांचे प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ऋषिकेश परांडे, महेश झंजाड, शुभम परांडे, प्रवीण गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, बाळू परांडे, संभाजी परांडे, मंगेश चौधरी, सत्यम निमसे, साधू सूर्यवंशी, साहेबराव चौधरी, संतोष शिंदे, सोमनाथ शिंदे, शुभम शिंदे, श्रीकांत परांडे सहभाग घेणार आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख