राज्यात वेगळा प्रयोग ! जामखेड तालुक्यातील सर्व क्वारंटाईन केवळ दोन ठिकाणी

जामखेडमधील तीन प्रमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारती शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये गावनिहाय विभागणी करून क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या गावांची यादी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रसिद्ध केली आहे
corona 4
corona 4

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी जामखेड व खर्डा ही दोन ठिकाण प्रशासनाने निश्चित केले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

सकाळ, सरकारनामा आणि ई - सकाळ या सकाळ माध्यम समुहाच्या माध्यमातून प्रशासनाला काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्या उपायोजनांची दखल घेऊन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी नव्याने 'प्रस्ताव' हाती घेतला. यासंदर्भात प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनाही हा प्रस्ताव आवडला. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची अडचण होती. यावर मात करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर येथील अडचणी सांगितल्या. त्यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून जामखेड तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड व खर्डा येथेच क्वारंटाईन करण्याच्या निर्णयावर अखेर प्रशासनाने आज शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ग्रामीण भागातील भीतीचे वातावरण कमी होण्यास मोठी मदत होईल.

तालुक्यातील तीन प्रमुख  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारती शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये गावनिहाय विभागणी करून क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या गावांची यादी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रसिद्ध  केली आहे.

जामखेडमधील ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये (21) गावांच्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये (38 )गावांच्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे, तर खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विलगीकरण कक्षात 29 गावच्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

ल .ना .होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड 
येथील विलगीकरण करण्यासाठी नमूद केलेली (21)गावे  अशी : जामखेड, धोत्री, बटेवाडी, चुंबळी, जमादारवाडी, मोहा ,भुतवडा ,लेनेवाडी, जामवाडी, साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, शिरूर, सावरगाव, पाडळी, खुरदैठण, कुसडगाव, सरदवाडी, रत्नापूर, सारोळा ,काटेवाडी.

नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड
या ठिकाणी विलगीकरण करण्यासाठी नमूद केलेली (38) गावे अशी : आरणगाव, पारेवाडी डोणगाव, पिंपरखेड, हसनाबाद, कवडगाव गिरवली, पाटोदा ,खामगाव, भवरवाडी, सांगवी, खांडवी, बावी, डिसलेवाडी, धोंडपारगाव राजेवाडी, फकराबाद, धानोरा, वंजरवाडी, हळगाव, चौंडी, आघी, मतेवाडी नान्नज, घोडेगाव, चोभेवाडी, पोतेवाडी, बोर्ले, मुंजेवाडी, जवळा, महारुळी, वाघा, गुरेवाडी ,राजुरी ,डोळेवाडी. 

न्यू इंग्लिश स्कूल ,खर्डा या ठिकाणी विलगीकरण करण्यासाठी नमूद केलेली (29) गावे अशी : खर्डा, मोहरी, नागोबाचीवाडी, मुंगेवाडी, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव, तरडगाव वंजरवाडी, सातेफळ दौंडाचीवाडी, सोनेगाव, धनेगाव, जवळके, नायगाव, नाहूली, देवदैठण, धामणगाव, पिंपळगाव (आळवा )आपटी, बांधखडक, पांढरेवाडी ,दरडवाडी, लोणी ,आनंदवाडी वाकी, बाळगव्हाण, तेलंगशी जायभावाडी, पिंपळगाव (उंडा).

विलगीकरण कक्ष सज्ज : तहसीदार
जामखेड व खर्डा ही दोन्ही ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी लागणाऱ्या सुविधा पुरवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून मदत करण्यात येणार आहे. हे तिन्ही विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.


-- 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com