धनजंय मुंडे निर्दोष, प्रकरणात राजकारण केलं जातंय - Dhanjanya Munde is innocent, politics is being used in the case | Politics Marathi News - Sarkarnama

धनजंय मुंडे निर्दोष, प्रकरणात राजकारण केलं जातंय

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांची राजकारणात तीस वर्षाची तपस्या आहे, त्यांनी आपल्या बाबतीत काहीही न लपवता जाहिर केल आहे. त्यांनी स्वत: सर्व माहिती दिली आहे.

जळगाव : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत:च जाहिर केल आहे कि मला ‘ती’ दोन अपत्य आहेत, आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. मला तरी वाटते की ते निर्दोष आहेत, या प्रकरणी निश्‍चित राजकारण केले जात आहे, असे मत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आज ‘कोविड’प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या नंतर पत्रकारांशी बोलतांना पाटील यांनी राज्यातील मंत्रीमंडळातील सहकारी धनजंय मुंडे यांची बाजू घेतली. धंनजय मुंडे यात निर्दोष आहे असे स्पष्ट मत व्यक्त करून या प्रकरणी त्यांचा राजीनामा मागण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत मंत्री पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांची राजकारणात तीस वर्षाची तपस्या आहे, त्यांनी आपल्या बाबतीत काहीही न लपवता जाहिर केल आहे. त्यांनी स्वत: सर्व माहिती दिली आहे. जर एखादा माणूस सर्व माहिती देत असेल, तर तुम्ही त्याला चोर ठविणार काय? आणि जर मुंडे यांना लपवायचेच असते, तर त्यांनी स्वत: वक्तव्य करून जनतेला माहिती दिलीच नसती. तसेच न्यायालयातही त्यांची लढाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांची तीस वर्षाची राजकीय तपस्या उध्वस्त करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर ती चुक आहे.

विनाकारण कोणाचाही बळी घ्यायचा, हे बरोबर नाही. या प्रकरणात राजकारण केले जात आहे, त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकारही कोणाला नाही. धनजंय मुंडे हे या प्रकरणात निर्दोष आहेत, चौकशीतही ते निर्दोष सिध्द होतील.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख