कारभारी बदलल्याने विकासाला खीळ ! वैभव पिचड यांचा आमदार डाॅ. लहामटेंना टोला - Development stalled due to change of caretaker! Vaibhav Pichad's MLA Dr. Lahamatenna tola | Politics Marathi News - Sarkarnama

कारभारी बदलल्याने विकासाला खीळ ! वैभव पिचड यांचा आमदार डाॅ. लहामटेंना टोला

शांताराम काळे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास होतो आहे. जिल्हा परिषदेचे गेली दहा वर्ष नेतृत्व करत असताना त्यांनी अकोले तालुक्याला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. 

अकोले : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेले मंजूर कामे अकोले तालुक्यात सुरू आहेत. कारभारी बदलेल्यामुळे अकोले तालुक्याच्या विकासाला खीळ बसली असून, वर्षभरात एकही नवीन काम आणता आले नाही, अशी सडकून टीका भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सचिव वैभव पिचड यांनी आमदार डाॅ. किरण लहामटे यांचे नाव न घेता केली.

कळस बुद्रुक येथे माजी आमदार पिचड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, विष्णू वाकचौरे, संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक सिताराम वाकचौरे, माजी सरपंच कारभारी वाकचौरे, यादव वाकचौरे, डी. टी. वाकचौरे, निवृत्ती मोहिते आदी उपस्थित होते. 

पिचड म्हणाले, की अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास होतो आहे. जिल्हा परिषदेचे गेली दहा वर्ष नेतृत्व करत असताना त्यांनी अकोले तालुक्याला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. 

गायकर म्हणाले की, मधुकर पिचड यांनी आम्हाला जिल्ह्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. त्या संधीतून समाज उपयोगी काम केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगळी ओळख कैलास वाकचाैरे यांनी निर्माण केली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कळसेश्वर देवस्थान संरक्षक भिंत, भवानी माता मंदिर सभामंडप, सांगवीरोड हरिजन वस्ती रस्ता, जिल्हा परिषद शाळा चार खोल्या, बिबवे वस्ती रस्ता डांबरीकरण या विकासकामांचे भुमीपुजन तर शाळा संरक्षक भिंतीचे उदघाटन करण्यात आले. 

सूत्रसंचालन भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन नुतन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गवांदे, ज्ञानेश्वर वाकचौरे, जिजाबा वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे, केतन वाकचौरे, संगिता भुसारी, संगिता चौधरी, स्नेहल वाकचौरे, स्वाती सरमाडे यांच्यासह नामदेव निसाळ, गोरख वाकचौरे यांनी केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख