नवरात्रोत्सावाची गर्दी, तरीही कोरोना रुग्ण केवळ 256 - Despite the Navratri crowd, the corona patient is only 256 | Politics Marathi News - Sarkarnama

नवरात्रोत्सावाची गर्दी, तरीही कोरोना रुग्ण केवळ 256

मुरलीधर कराळे
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून नवरोत्रोत्सवाची तयारीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. नगर शहरातील कापडबाजार, चितळेरोड तर फुलून गेला आहे. असे असतानाही कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत नसल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नगर : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून नवरोत्रोत्सवाची तयारीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. नगर शहरातील कापडबाजार, चितळेरोड तर फुलून गेला आहे. असे असतानाही कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत नसल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आज नव्याने केवळ 256 बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांनी 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 50 हजार 19 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 94.23 टक्के झाले आहे. आज नव्याने 307 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूची संख्या आतापर्यंत 808 इतकी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 53 हजार 83 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात नवरोत्रोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नगर शहरातील केडगाव येथील अंबिका, पाथर्डी तालुक्यातील मोहटा गडावरील मोहटा देवी, कोल्हारची कोल्हुबाई, नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथील अंबिका, राहाता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती, कर्जत तालुक्यातील राशीनची यमाई आदी महत्त्वाचे देवीची ठाणे जिल्ह्यात आहेत. कालपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त मागील आठवडयापासून बाजारपेठेत मोठी गर्दी होती. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण वाढतील की काय, अशी भिती नागरिकांना होती, तथापि, जिल्हयाची रुग्णसंख्येत घटच होत असल्याने समाधानाचे वातावरण आहे. अशीच स्थिती राहिल्यास लवकरच शहर कोरोनामुक्त होईल, अशी आशा प्रशासन व नागरिकांना आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख