कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्याने आढळले केवळ 316 - Decrease in corona patients, only 316 newly found | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्याने आढळले केवळ 316

मुरलीधर कराळे
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

आज नव्याने केवळ 316 रुग्ण आढळले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही निम्याने कमी झाली असून, सध्या 2 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

नगर : जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने घटत असून, आज नव्याने केवळ 316 रुग्ण आढळले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही निम्याने कमी झाली असून, सध्या 2 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

नगर : जिल्ह्यात आज ४३४  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज रूग्ण संख्येत ३१६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६५२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९१ आणि अँटीजेन चाचणीत १८४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ७, पारनेर २, पाथर्डी १, राहाता ५, राहुरी २, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २४, अकोले २२,  जामखेड २, कोपरगाव १, नगर ग्रामीण ६, नेवासे ३, पारनेर ८, पाथर्डी १०, राहुरी १, संगमनेर १, श्रीगोंदे ९, मिलिटरी हॉस्पिटल ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १८४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १२, अकोले ९, जामखेड १६, कर्जत १०,  कोपरगाव १०, नगर ग्रामीण ७, नेवासे १६, पारनेर ४, पाथर्डी ३५, राहाता २०, राहुरी ७, संगमनेर १३, शेवगाव १२, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 688 झाली असून, आतापर्यंत 796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 136 रुग्ण आढळले आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख