`निळवंडे`ला निधी कमी पडू देणार नाही, या नेत्यांच्या बैठकित निर्णय - The decision of these leaders will not allow Nilwande to run out of funds | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

`निळवंडे`ला निधी कमी पडू देणार नाही, या नेत्यांच्या बैठकित निर्णय

मुरलीधर कराळे
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

कोणत्याही परिस्थितीत कामाची गती कमी न होऊ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या प्रयत्न करण्याचा निर्णय आजच्या बैठकित घेण्यात आला आहे.

नगर : महाविकास आघाडी सरकार निळवंडे प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्व अभियंत्यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कामाची गती कमी न होऊ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या प्रयत्न करण्याचा निर्णय आजच्या बैठकित घेण्यात आला आहे.

निळवंडे धरणाच्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. याबाबत तनपुरे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी निधीची तरतूद होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. तथापि, अनेक अडथळे येत आहेत. याबाबत आज मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. निळवंडे धरणाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपस्थितांनी एकमताने निर्णय घेत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले. 

निळवंडे धरण झाल्यानंतर उर्वरीत कामांसाठी निधीची कमतरता होती. विशेषतः कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी अपेक्षित आहे. परंतु अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारकडून हा निधी मिळविण्यात अडचणी येत आहे. या प्रश्नांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कायम पाठपुरावा सुरू आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीनही पक्षांचे नेते एकत्र आहेत. त्यामुळे निधी मिळविण्यात अडचण येणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख