नगर जिल्ह्यात मृत्यूने गाठले 700 कोरोना रुग्ण - The death toll in the Nagar district reached 700 Corona patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

नगर जिल्ह्यात मृत्यूने गाठले 700 कोरोना रुग्ण

मुरलीधर कराळे
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 703 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या 43 हजार 349 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 42 हजार 278 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.

नगर : जिल्ह्यात आतापर्यंत 703 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या 43 हजार 349 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 42 हजार 278 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात काल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ७९० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार २७८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२,
अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, राहुरी २, शेवगाव ८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६९, अकोले २, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ३३, नेवासा १६, पारनेर ११, पाथर्डी १२, राहाता १७, राहुरी १६, संगमनेर १०, शेवगाव १३, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल ४०६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १, नेवासे ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५ आणि कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८३४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १७५, अकोले ३६, जामखेड ४१, कर्जत ३१, कोपरगाव ४४, नगर ग्रामीण ८७, नेवासे ३०, पारनेर ४०, पाथर्डी ६३, राहाता ६५, राहुरी ५६, संगमनेर ५३, शेवगाव २३, श्रीगोंदे ३७, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट १३, मिलिटरी हॉस्पिटल १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख