मृत्यूनेच गाठली शंभरी ! आज आढळले 646, जिल्हा दहा हजारांच्या उंबरठ्यावर - Death alone reached a hundred! Found today 646, the district on the threshold of ten thousand | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूनेच गाठली शंभरी ! आज आढळले 646, जिल्हा दहा हजारांच्या उंबरठ्यावर

मुरलीधर कराळे
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

जिल्ह्यात एकूण रूग्ण संख्या ९ हजार २४० झाली असल्याने येत्या दोन दिवसांत रुग्ण संख्या 10 हजारांचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे.

नगर : जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100 झाली आहे. तसेच नव्याने 646 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण रूग्ण संख्या ९ हजार २४० झाली असल्याने येत्या दोन दिवसांत रुग्ण संख्या 10 हजारांचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खासगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार २७४ झाली आहे. आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आले असून, घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५ हजार ८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६३.४८ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारपर्यंत १५ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर १, नगर शहर ९, कॅन्टोन्मेंट ५ अशा रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर,आणखी २४ रूग्ण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहर ६, नगर तालुका २, जेऊर १, घोसपुरी १, कोपरगाव १, जामखेड १, कँटोन्मेंट १, श्रीरामपुर ६, नेवासे १, पारनेर ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळून आले. यामध्ये महापालिका ५५, संगमनेर १५, राहाता १२, पाथर्डी ५५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपुर २३, कॅन्टोन्मेंट १५, नेवासे ४, श्रीगोंदे १९, पारनेर १२, अकोले १९, राहुरी १६, शेवगाव ६, कोपरगाव १८, जामखेड ५ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, नगर शहर २२६, संगमनेर ३, राहाता ३, पाथर्डी ३, नगर तालुका १५, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ८,  नेवासे ४, श्रीगोंदा ३, पारनेर १२, अकोले १, राहुरी ४, शेवगाव १, कर्जत ८ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख