पारनेर तालुक्यात वाळुतस्करांची दादागिरी ! नायब तहसीलदारांना धक्काबुक्की - Dadagiri of sand smugglers in Parner taluka! Pushing the Deputy Tehsildar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

पारनेर तालुक्यात वाळुतस्करांची दादागिरी ! नायब तहसीलदारांना धक्काबुक्की

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

अनेकदा अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचे प्रकार तालुक्यात घडले आहेत. इतकेच नव्हे, तर तहसीलदारांवर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्नही झाला आहे.

पारनेर : ढवळपुरी शिवारात वाळूवाहतूक करणारा ट्रक नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी पकडला. तहसील कार्यालयात ट्रक घेऊन येताना, डिकसळ येथील कुलट वस्तीजवळ वैभव पाचारणे याने ट्रकला दुचाकी आडवी लावली. नायब तहसीलदार माळवे यांना धक्काबुक्की केली. तसेच साक्षीदार सुनील भाबड यांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी पारनेर पोलिसांत सात जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.  राजू चंद्रकांत पाचारणे, नवनाथ कुटे, प्रीतम कुटे, प्रवीण कुटे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींनी माळवे यांचा मोबाईल हिसकावून अंदाजे चार ब्रास वाळू रस्त्यावर खाली करून ट्रक घेऊन भाळवणीच्या दिशेने पळ काढला. याबाबत माहिती मिळताच, तहसीलदार ज्योती देवरे घटनास्थळी गेल्या. आरोपी विठ्ठल कुटे यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. 

दरम्यान, यापूर्वीही अनेकदा अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचे प्रकार तालुक्यात घडले आहेत. इतकेच नव्हे, तर तहसीलदारांवर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्नही झाला आहे. अनेक घटना घडूनही वाळुतस्करांची दादागिरी कमी होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पारनेर तालुक्यातील वाळुतस्करांचे हल्ले महाराष्ट्रात गाजले होते.

Edited By - Murlidhar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख