महापौर निवडणुकीबाबत सध्या ‘वेट ॲण्ड सी‘ : शिवाजी कर्डिले यांची भूमिका

नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही नगरसेवकांशी चर्चा केली आहे. नगर शहरात भाजपचे वर्चस्व राहण्यासाठी तेही प्रयत्न करीत आहेत.
shivaji kardile.jpg
shivaji kardile.jpg

नगर : महापौर निवडणुकीसाठी भाजपची भूमिका सध्या तरी ‘वेट ॲण्ड सी‘ अशीच आहे. सर्व नगरसेवकांशी वरिष्ठ नेते बोलत आहेत. सर्वांना विचारात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. भाजपकडे या पदासाठी आरक्षणानुसार उमेदवार नाही. त्यामुळे खूप धावपळीची गरज नाही. मात्र सत्तेत राहण्यासाठी आवश्य प्रयत्न केला जाईल. कोणाला मदत करायची की कसे, याबाबत लवकरच भूमिका घेऊ, अशी माहिती भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी `सरकारनामा` शी बोलताना दिली. (Currently 'Wait and See' regarding the mayoral election: Shivaji Kardile's role)

कर्डिले म्हणाले, की भाजप सध्या राज्यात विरोधी बाकावर आहे. मात्र स्थानिक पाळीवर राज्यात अनेक संस्थांवर भाजपचे वर्चस्व आहे. सत्तेत राहण्यासाठी भाजप प्रयत्न करेल. त्यामुळे कोणाला मदत करायची, याचा निर्णय वेळ आल्यानंतर घेतला जाईल.

भाजपने महापौर असताना शहरात चांगले काम केले. मोठा निधी आणून शहराच्या विकासात भर घातली. कोरोनाच्या काळातही महापालिकेने चांगले काम केले. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आगामी काळातही सत्तेत राहून नगरकरांसाठी चांगले काम करता येईल. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. याबाबत नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही नगरसेवकांशी चर्चा केली आहे. नगर शहरात भाजपचे वर्चस्व राहण्यासाठी तेही प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महापौरपदासाठी आरक्षणानुसार भाजपकडे उमेदवार नाही. काॅंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीकडे उमेदवार आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या पदरात महापौरपद घेण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे राजकीय घडामोडीत कोणाच्या पदरात हे पद पडेल, हे काळच ठरवेल. परंतु एखाद्या पक्षाला मदत करणे, ही आमची भूमिका असेल, असे कर्डिले यांनी सांगितले.

हेही वाचा...

हेही वाचा...

हेही वाचा...

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com