त्यांचा जन्मच टीका करण्यासाठी ! रोहित पवार यांचा पडळकर यांच्यावर प्रतिहल्ला - To criticize his birth! Rohit Pawar's counter-attack on Padpalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

त्यांचा जन्मच टीका करण्यासाठी ! रोहित पवार यांचा पडळकर यांच्यावर प्रतिहल्ला

नीलेश दिवटे
शनिवार, 19 जून 2021

त्यांनी विकास करावा, विकास बोलावा, मात्र यावर न बोलता जेथे जातील, तेथे पवार कुटुंबियांवर टीका करतात..टीका करून नेत्यांचे पोट भरेल, मात्र सर्वसामान्यांना काहीही मिळत नाही.

कर्जत : यांचा राजकीय जन्मच टीका करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाने बहुदा त्यांना आमदारकी बहाल केली असावी, मात्र .ते काम उत्तम करीत आहेत. ते बहुजनांचे प्रतिनिधी असताना ज्या पक्षाने मंडल आयोगाला कडाडून विरोध केला. त्याच पक्षात ते आहेत. जग इकडच तिकडे जरी झाले, तरी मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही, ही केलेली भीष्मप्रतिज्ञा काही क्षणातच विरली. ते सध्या भाजपात असून, त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा, असा प्रतिहल्ला आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चढविला. (To criticize his birth! Rohit Pawar's criticism of Padwalkar)

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आरक्षण आंदोलनाबाबत घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत कर्जत येथे बोलताना पवार यांनी पडळवकर यांच्यावर टीकेची झोड उठविली. 

ते म्हणाले, की त्यांनी विकास करावा, विकास बोलावा, मात्र यावर न बोलता जेथे जातील, तेथे पवार कुटुंबियांवर टीका करतात..टीका करून नेत्यांचे पोट भरेल, मात्र सर्वसामान्यांना काहीही मिळत नाही. त्यांनी दोन वर्षानंतर कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात येऊन झालेला विकास पहावा.

मी स्वयंघोषित मुख्यमंत्री आहे, असे कुठेच म्हटलो नाही  ते लोकशाहीतील महत्वाचे पद आहे, मी अशी घोषणा कुठे केली, ते त्यांनी सांगावे. मी कार्यकर्ता होतो. मी कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्याचा कार्यकर्ता शेवटपर्यंत राहील. भाजपची भूमिका काय आहे, हे मला माहिती नाही. मात्र त्यांनी राजकीय रणनीती आखण्यापेक्षा कोरोना काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅस ची दरवाढ झाल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे, त्याविरुद्ध केंद्रात आवाज उठविण्यासाठी, सर्वसामान्याचे विषय केंद्राकडे मांडण्यासाठी  भाजपने रणनीती ठरवावी.

बारामती एग्रो ही महाराष्ट्रातील एक संस्था असून, तिच्याशी हजारो, लाखो शेतकरी जोडले गेले आहेत. ते कोणत्या विषयावर बोलले माहिती नाही, मात्र प्रत्येक बाबीला पुरावा असतो, याही बाबतीत असेल, असे सूचक वक्तव्य केले.

 

हेही वाचा..

जयंत पाटलांमुळेच गोदावरीचा कायाकल्प

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख