विखे पाटील, शिंदे, मुरकुटे यांच्यासह भाजप नेत्यांवर गुन्हे - Crimes against BJP leaders including Vikhe Patil, Shinde, Murkute | Politics Marathi News - Sarkarnama

विखे पाटील, शिंदे, मुरकुटे यांच्यासह भाजप नेत्यांवर गुन्हे

मुरलीधर कराळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दुधप्रश्नी आंदोलन करून जमावबंदीचा भंग केल्याच्या कारणावरून माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

नगर : दुधप्रश्नी आंदोलन करून जमावबंदीचा भंग केल्याच्या कारणावरून माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

दूध दरवाढीबाबत काल भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यभर आंदोलने करण्यात आले. नगर जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात आंदोलने झाली. शिर्डी येथे विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघण झाल्याच्या कारणावरून विखे पाटील यांच्यासह सुमारे 35 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. तेथेही जमावबंदीच्याआदेशाचे उल्लंघण केल्याने शिंदे यांच्यासह 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासे येथे रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने त्यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे आदींसह सुमारे 35 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

याबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणी आंदोलने झाल्याने बहुतेक ठिकाणी भाजपनेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल करून सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी यापूर्वीच केला होता. कितीही गुन्हे दाखल केले, तरीही आंदोलनातून माघार नाही, अशी भूमिका बहुतेक नेत्यांनी घेतली आहे. तसेच दुधाला दर वाढ करून मळाली नाही तसेच दुध प्रश्नी इतर मागण्या मान्य झाल्या नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, अशा आशाराही नेत्यांनी आंदोलनात दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, तरीही हे कार्यकर्ते पुन्हा नव्याने आंदोलन करण्यात उभे राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया उटमटली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख