कोविड सेंटर अनेक, तरीही खासगी रुग्णालयात `वेटिंग` - Covid Center High, `Waiting` for patients in a private hospital | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड सेंटर अनेक, तरीही खासगी रुग्णालयात `वेटिंग`

मुरलीधर कराळे
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. सध्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ५८४ रुग्ण उपचार घेत आहेत.

नगर : कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रसाशन, सामाजिक संस्था प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्या, तरी रोजचे आकडे, मृत्यू धडकी भरणारी ठरत आहेत. जिल्ह्यात कोविड सेंटर अनेक झाले, मात्र तेथेही आपण सुरक्षित आहोत का, ही भावना रुग्णांच्या मनात कायम राहते. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बेड शिल्लक नाहीत. 

उपचार महागडे असले, तरी जीवनाशी खेळणे नको म्हणून संबंधित रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेताना दिसत आहेत. त्यामध्ये काही इंजेक्श्नची कमतारता असल्याने रुग्णांची धावाधाव होताना दिसत आहे. बहुतेक खासगी रुग्णालयात बेड फुल झाल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात काल ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 290 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 21 हजार 50 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाले आहेत. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल रूग्ण संख्येत ४६५ ने वाढ झाली असून, यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ५८४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्टलॅब मध्ये १३१, अँटीजेन चाचणीत १३९ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ६९, संगमनेर २४, पाथर्डी १, नगर ग्रामीण ३, नेवासे १, पारनेर ७, अकोले ३, राहुरी २, शेवगाव १९ आणि मिलिटरी हॉस्पिटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत १३९ जण बाधित आढळून आले. यामध्ये महापालिका हद्दीत ३, राहाता १५, पाथर्डी १,  नगर ग्रामीण १९, श्रीरामपूर १८, नेवासा ३६, श्रीगोंदा १, अकोले ९, शेवगाव १, कोपरगाव १८, जामखेड ३ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. सध्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ५८४ रुग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत कोरोना मुळे २९० रुग्ण दगावले आहेत. यामध्ये, महापालिका हद्दीदील १२२, संगमनेर २७, राहाता १०, पाथर्डी १०, नगर तालुका १७, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ११, नेवासा ९, श्रीगोंदा १३, पारनेर १३, अकोले ३, राहुरी १२, शेवगाव ७,  कोपरगाव ८, जामखेड ७ आणि कर्जत ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख