बाहेरील जिल्ह्यातून आले अन नगरचे कोरोनामीटर चारने वाढविले

काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथून आलेल्या बाधित महिलेचा दुसरा अहवालही "पॉझिटिव्ह' आला. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 83 वर गेली आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
Corona
Corona

नगर : बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींमुळे नगरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज जिल्ह्यात चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यांत मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद येथून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. उर्वरित 14 अहवाल "निगेटिव्ह' आले. 

जिल्हा रुग्णालयातील कोविड टेस्ट लॅबमध्ये 19 जणांच्या घशातील स्राव तपासण्यात आले. त्यात चौघे बाधित आढळून आले. त्यांतील 26 वर्षीय व्यक्ती 17 मे रोजी मुंबईहून वांबोरीत (राहुरी) आली होती. दुसरी 60 वर्षीय बाधित व्यक्ती मुंबई (तुर्भे) येथून 22 मे रोजी सिद्धटेकला (कर्जत), तिसरी 32 वर्षीय बाधित व्यक्ती औरंगाबाद येथून 20 मे रोजी वडाळा महादेव येथे (श्रीरामपूर), तर चौथी व्यक्ती उल्हासनगर येथून 22 मे रोजी नेवाशात आली होती. 

काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथून आलेल्या बाधित महिलेचा दुसरा अहवालही "पॉझिटिव्ह' आला. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 83 वर गेली आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. 
 
निमोण येथील बाधिताचा मृत्यू 
निमोण (संगमनेर) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा नाशिक येथे उपचारादरम्यान काल (शनिवारी) रात्री मृत्यू झाला. नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मृत रुग्णांची संख्याही आता नऊ झाली आहे. 

हेही वाचा...

पाहुण्यांनी धडकी भरवली 

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांत वाढल्याने अनेकांनी गावचा रस्ता धरला. मात्र, शहरांतून आलेले अनेक जण कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. "या पाहुण्यांना आता थांबवा हो,' अशी मागणी होत आहे. 

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. नोकरी- व्यवसायानिमित्त अनेकजण त्या शहरांत स्थायिक झाले. मात्र, कोरोनाच्या धास्तीने आता ते गावाकडे परतत आहेत. त्यांतील काही मंडळी तपासणी करून व गावात आल्यानंतर विलगीकरण कक्षात थांबत आहेत. मात्र, काही जण रात्री-अपरात्री चोरवाटांनी गावात येऊन थेट घरी पोचत आहेत. त्यामुळे सर्वच ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. ही मंडळी रात्री-अपरात्री येते कशी? त्यांना कोण आणून सोडते? जिल्ह्याच्या सरहद्दीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व कर्मचारी करतात काय, असे एक ना अनेक प्रश्‍न यातून उपस्थित होत आहेत. 

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून, बाहेरून आलेले नागरिकच कोरोनाबाधित आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाहुण्यांना गावाबाहेरच ठेवा, नाही तर त्यांना शहरातच थांबवा, अशी मागणी होत आहे. 

जिल्ह्याच्या हद्दीवर बंदोबस्त वाढवा 
जिल्ह्याच्या हद्दींवर तपासणी केली जात असली, तरी अनेक जण बाहेरील जिल्ह्यांतून रात्रीच्या वेळी येत आहेत. हा प्रकार थांबला नाही, तर कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमांवरील बंदोबस्त आणखी कडक करावा. विशेषत: रात्रीचा बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे. 

दरम्यान, शहरातून गावात येताना वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र घेऊन येतात. मात्र, हे प्रमाणपत्र त्यांना तपासणी झाली त्या वेळी कुठलाही त्रास होत नसल्याबाबतचे आहे. प्रवासात त्यांना काही बाधा झाली, तर त्याचा या प्रमाणपत्राशी काही संबंध येत नाही. त्यामुळे शहरातून आल्यावर प्रत्येकाने तपासणी करून, खबरदारी म्हणून विलगीकरण कक्षात राहणे गरजेचे आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com