जामखेडमध्ये ऐतिहासिक पंचमीच्या उत्सवावर कोरोनाचे विरजण

नागपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षीभरणारी जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरली नाही.तसेच उद्या भरणाराकुस्त्यांचा फड हीरंगणार नाही.
nagpanchami.jpg
nagpanchami.jpg

जामखेड : नागपंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी भरणारी जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरली नाही. तसेच उद्या भरणारा कुस्त्यांचा फड ही रंगणार नाही. उलट या दोन्ही दिवशी जामखेडमध्ये जनता कर्फ्यू करण्यात आला असल्याने सर्वांना घरातच थांबावे, आपली व आपल्या कुटुबांची काळजी घ्यावी, बाहेर पडू नये, असे अवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

मागील पाच महिण्यांपासून जामखेडकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत कोरोनाशी सामना केला. हाॅट स्पाॅट मधून जामखेडकर तालून-सुलाखून निघाले आहेत. दरम्यान, मागील पंधरवड्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडले; मात्र त्यांते मुंबई-पुण्याहून आलेलेच निघाले. तरीही प्रशासनाने सतर्क दर्शवली. आमदार रोहित पवार यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्या; काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

दरम्यान, जामखेडच्या ग्रामदैवत नागेश्वराचा यात्रा उत्सव नागपंचमीच्या दिवशी असतो. ही यात्रा आज भरली नाही. जामखेड तालुक्याच्या चारही बाजुंनी असलेल्या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असून, उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या रहदारीमुळे संसर्गाचाचा धोका जामखेड तालुक्याला पोहोचू शकतो, या मुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून यावर्षीचा यात्रा उत्सवच भरवायचा नाही, यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. तसेच यात्रा उत्सवाच्या मुख्य दोन्ही दिवशी जनता कर्फ्यू राबविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आजपासून जनता कर्फ्यू सुरू झाला आहे.

जामखेडशी बीड व उस्मानाबाद जिल्हा सलग्न आहे. तसेच औरंगाबादमधील गावेही या शहराच्या संपर्कात असतात. बाजुच्या या जिल्ह्यांतील काही गावांमध्ये संसर्ग वाढला आहे. त्यामुळे हे लोक यात्रोत्सवाला येतील. साहजिकच कोरोनाशी सामना केलेल्या जामखेडला त्या लोकांपासून पुन्हा बाधा होईल, ही शक्यता गृहित धरून संपूर्ण लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जामखेडची पंचमी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या उत्सवाला इतिहास आहे. असे असले, तरी हा उत्सव परंपरा या वर्षी खंडित करण्यात आला आहे.

लोकांनी रस्त्यावर येवू नये : नाईकवाडे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होऊ नये व साथीचा फैलाव होऊ नये म्हणून दक्षता समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पंचमी सणाच्या दिवसांत ता. 25 व 26 जुलै रोजी शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येईल. त्यानुसार आज व उद्या जामखेड शहरातील सर्व दुकाने बंद राहती. तसेच नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com