कोरोनाचे असेही क्रोर्य ! एकाच कुटुंबातील दोन कर्त्या मुलांसह आईचाही मृत्यू - Corona's such a cry! The mother also died along with two children from the same family | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचे असेही क्रोर्य ! एकाच कुटुंबातील दोन कर्त्या मुलांसह आईचाही मृत्यू

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 11 जून 2021

नारायणगव्हाण येथील शेळके कुटुंबातील कोरोनामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरीब कुटुंबातील दोन कर्त्या व होतकरू अशा दोन मुलांसह आईचाही मृत्यू झाला.

पारनेर : नारायणगव्हाण येथील शेळके कुटुंबातील कोरोनामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरीब कुटुंबातील दोन कर्त्या व होतकरू अशा दोन मुलांसह आईचाही मृत्यू झाला. आता त्या दोघांच्या पत्नी व छोटी चिमुकली मुले मागे उरली आहेत. त्यांचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न या महिलांसमोर उभा राहिला आहे. (Corona's such a cry! The mother also died along with two children from the same family)

या कुटुंबाला मदत करावी, अशी सोशल मिडीयातून मागणी सुरू झाली असून एक लाख रूपयांचा निधीही जमा झाला आहे. तालुक्यात कोरोनामुळे दोनशेहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक लोंकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्थ झाली आहेत. नारायण गव्हाण येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. ही अतीशयधक्कादायक व हृदय हेलावून टाकणारी घटना आहे. या तिघांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नारायणगव्हाण येथील शेळके कुटुंबातील आई व दोन मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

प्रथम रांजणगाव एमआयडीसीत नोकरीस असलेल्या मच्छिंद्र यास कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आई सुगंधाबाई यांना कोरोनाची लागण झाली, या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे येथे नोकरीस असेलेला अविनाश आई व भावाला कोरोनाची लागण झाल्यामुळे गावी आला. त्या दोघांच्याही औषोधोपचारासाठी त्याची धवपळ झाली. त्यातच त्यालाही कोरोनाची लागण झाली. त्याच्यावरही महिनाभर ऊपचार करण्यात आले. मात्र, डॉक्टरांना य़श आले नाही. दुर्देवाने त्याचाही शेवटी पाच जूनला मृत्यू झाला.

 

हेही वाचा...

आरोग्य केंद्रास औषधांची भेट

अकोले : कळस येथील दहावीच्या वर्गमित्र यांनी "एक हात मदतीचा" या स्तुत्य उपक्रमात मैत्री दिनाचे अवचित्य साधून कोरोनाच्या काळात नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी लागणारे तीस हजार रुपयांची औषधे आरोग्य केंद्राला भेट दिली आहे.

कळसेश्वर विद्यालय, कळस बु दहावीच्या सन १९९६ च्या वर्गमित्र जागतिक मैत्री दिनाचे निमित्ताने केरु वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, प्रवीण वाकचौरे, माधव कोल्हाळ, संजय रणशूर, विकास आंबरे, आण्णा गाडेकर, बापू म्हस्के, कैलास वाकचौरे, संजय ढगे, सचिन वाकचौरे, संतोष जगदाळे, शांता चव्हाण, संगीता वाकचौरे, सविता वाकचौरे, मनीषा वाकचौरे, मनीषा झोडगे, आशा हुलावळे, शारदा वाकचौरे, शिल्पा वाकचौरे, कमल आभाळे या वर्गमित्र यांनी एकत्र येऊन गावाला एक हात मदतीचा या उपक्रमात सहभागी झाले.

ही औषधे आरोग्यसेविका प्रतिभा अंदुरे यांच्या ताब्यात दिले. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, ग्रामसेवक के.पी.भोर, भाजयुमो चे तालुका उपाध्यक्ष नामदेव निसाळ उपस्थितीत होते.

गावातील गोरगरीब नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी लागणारे तिस हजाराच्या किंमतीचे गोळ्या औषधे भेट दिले.

हेही वाचा..

कोविड सेंटरमध्ये बांधली लग्नगाठ

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख