कोरोनाचे राैद्ररुप ! नगर जिल्ह्यात आज आढळले 167 रुग्ण - Corona's nightmare! 167 patients found in Nagar district today | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचे राैद्ररुप ! नगर जिल्ह्यात आज आढळले 167 रुग्ण

मुरलीधर कराळे
गुरुवार, 16 जुलै 2020

सध्या जिल्ह्यात 516 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण बरे झालेले रुग्ण 773 असून, आतापर्यंत 33 जणांचामृत्यू झाला आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाने आता राैद्ररुप धारण केले असून, आज दिवसभरात तब्बल 167 रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून भितीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनातून बरे होऊन 46 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ११५ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेत 52 आढळले. या मुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३२२ झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ असून, आज ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ७७३ झाली आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात ३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्यातील ११, नगर शहरात १६ आणि श्रीगोंदे तालुक्यातील ५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. दुपारी आलेल्या अहवालानुसार १७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह असून, पाथर्डी तालुक्यात 10 रुग्ण आढळले. त्यामध्ये पाथर्डी शहरातील ८, कोल्हूबाईचे कोल्हार येथे 2 रुग्ण आढळले आहेत. नगर शहराजवळील भिंगार येथे 2, घोसपुरी येथे 1 रुग्ण बाधित आढळला. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ३, म्हैसगाव १ जणांचे अहवाल बाधित आढळून आले.

सायंकाळी आलेल्या अहवालात ६५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. यामध्ये पारनेर तालुक्यातील सिध्देश्वरवाडी ३, खडक वाडी १ रुग्ण आढळला. पाथर्डी तालुक्यातील आगासखांड २, कोल्हुबाई कोल्हार ९, तिसगाव ३, त्रिभुवनवाडी  ४, खाटीक गल्ली पाथर्डी 14 असे रुग्ण आढळून आले. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे 8 रुग्ण आढळले. नेवासे तालुक्यातील शिरसगाव येथेही रुग्ण आढळला आहे. नगर तालुक्यात एकूण 13 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये नागापूर २, पोखर्डी ८, देऊळगाव १, सांडवा २, नगर शहर २ असे रुग्ण आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यातील दिघोळ २, लहाने वाडी १ रुग्ण आढळले. श्रीगोंदे तालुक्यातील घोगरगाव येथे 1, संगमनेर खुर्द येथे 1 रुग्ण आढळून आले.

सध्या जिल्ह्यात 516 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण बरे झालेले रुग्ण 773 असून, आतापर्यंत 33 जणांचामृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाने आता राैद्र रुप धारण केले असून, रोज आलेले आकडे लोकांची धडकी भरणारे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी काळात शेतीमाल उत्पादित होणार असून, तो विकायचा कुठे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कारण गाव बंद आणि शहरातही शांतता राहण्याची शक्यता असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख