Corona's financial dilemma was finally solved by strangulation | Sarkarnama

कोरोनाने केलेली आर्थिक कोंडी, अखेर गळफासानेच फुटली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

दशमी गव्हाण येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शिंदे बुधवारी (ता. 27) रात्री गेले होते. मात्र, त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे वस्तीवरील लोकांना आज सकाळी दिसले. पोलिस पाटील जयसिंग काळे यांनी नगर तालुका पोलिसांना खबर केली.

नगर : दशमी गव्हाण येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दादा भाऊ शिंदे (वय 55) असे त्याचे नाव आहे. शिंदे यांच्यावर एक बॅंक व सहकारी संस्थेचे सुमारे सहा लाख रुपये कर्ज होते. कोरोनामुळे झालेली आर्थिक कोंडी व शेतीवरील संकटाने हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. 

दशमी गव्हाण येथील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शिंदे बुधवारी (ता. 27) रात्री गेले होते. मात्र, त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे वस्तीवरील लोकांना आज सकाळी दिसले. पोलिस पाटील जयसिंग काळे यांनी नगर तालुका पोलिसांना खबर केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. 

हेही वाचा...

तलाठ्याला दमबाजी करून वाळूची दोन वाहने पळविली 

बोटा : वाळूने भरलेली दोन वाहने तलाठ्याला दमबाजी करून पळविल्याची घटना संगमनेर तालुक्‍यातील घारगाव परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली. 

कोठे बुद्रुकचे तलाठी रवींद्र मुकुंद हिरवे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, की मिळालेल्या खबरीनुसार मी आणि बोटा, घारगावचे कोतवाल मिथुन खोंड व शशिकांत खोंड तिघांना मुळा नदीच्या रासकाई मंदिर परिसरात विनापरवाना अवैध वाळूवाहतूक करताना दोन वाहने आढळली. त्यापैकी ट्रॅक्‍टर (एमएच 11 एसी 1256) व एक पिकअप टेम्पो या दोन्ही वाहनांमध्ये सहा हजारांची दोन ब्रास चोरीची वाळू आढळली. या वेळी ट्रॅक्‍टरचे मालक किरण सकपाळ व दुसऱ्या वाहनाचे मालक हर्षद खालीद शेख यांना वाळूने भरलेली दोन्ही वाहने पोलिस चौकीत घेऊन येण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या दहा-बारा मजुरांच्या साह्याने गोंधळाचे वातावरण निर्माण करून वाळूने भरलेली दोन्ही वाहने पळवून नेली. या घटनेवरून तलाठ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी करणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही वाहनांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख