कोरोनाचा आकडा 500 च्या आत, संगमनेरची आघाडी कायम, नगर शहरात दिलासा - Corona's figure within 500, Sangamner's lead maintained, comfort in the city | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा आकडा 500 च्या आत, संगमनेरची आघाडी कायम, नगर शहरात दिलासा

मुरलीधर कराळे
बुधवार, 9 जून 2021

सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले असले, तरी अशा गर्दीमुळे पुन्हा वाढतील की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

नगर ः कोरोना (Corona) रुग्णांचा नगरमधील आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे. आज केवळ 499 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये संगमनेरची आघाडी असून, तालुक्यात 61 रुग्ण आढळून आले आहेत. (Corona's figure within 500, Sangamner's lead maintained, comfort in the city)

नगर जिल्ह्यात आता संपूर्ण अनलाॅक झाल्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. प्रत्येक दुकानांमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली होत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले असले, तरी अशा गर्दीमुळे पुन्हा वाढतील की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत. आज केवळ 499 रुग्ण आढळले. रुग्णालयांमध्येही आॅक्सिजन बेड सहजासहजी मिळत आहेत. अनेक कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या 50 टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे.

आज जिल्ह्यात आढळलेले रुग्ण तालुकानिहाय असे ः संगमनेर 61, पाथर्डी 57, अकोले 56, जामखेड 46, पारनेर 44, श्रीगोंदे 42, नेवासे 38, राहाता 35, श्रीरामपूर 33,  कर्जत 15, राहुरी 15, नगर तालुका 12, शेवगाव 12, कोपरगाव 11, नगर शहर 10, भिंगार 6, इतर जिल्ह्यातील 6 अशी रुग्णसंख्या होती.

 

हेही वाचा...

सारोळा ग्रामस्थांची कोविड सेंटरला लाखाची मदत

आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे उभारलेल्या ११०० बेडच्या कोविड सेंटरसाठी सारोळा कासार (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी जमा करून दिला. या मदतीचा धनादेश नुकताच लंके यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला.

कोरोना संकटाच्या काळात गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे ११०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले. तेथे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्यांना काय त्रास होत आहे हे जाणून घेणे, ही कामे स्वतः लंके करीत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहे. त्यातून त्यांना कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे.
सारोळा कासार ग्रामस्थांनीही स्वयंस्फूर्तीने या कामासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व २ दिवसांत १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदतनिधी जमा केला. संजय धामणे, जयप्रकाश पाटील, संजय काळे, राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, बाळासाहेब धामणे, गजानन पुंड, सुनील हारदे, महेश धामणे, बाळासाहेब कडूस, शहाजान तांबोळी, मच्छिंद्र धामणे, गणेश काळे, सचिन कडूस, महेश रोडे यावेळी उपस्थित होते. 

 

हेही वाचा..

थोरोतांच्या मतदारसंघातील या गावचे कौतुक

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख