स्वातंत्र्यदिनी कोरोनाचा आकडा धडकी भरविणारा, 512 जणांना डिस्चार्ज - Corona's figure shocking on Independence Day, 512 people discharged | Politics Marathi News - Sarkarnama

स्वातंत्र्यदिनी कोरोनाचा आकडा धडकी भरविणारा, 512 जणांना डिस्चार्ज

मुरलीधर कराळे
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

सध्या जिल्ह्यात १२ हजार ८६९ कोरोना बाधित आढळले असून, आतापर्यंत 153 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नगर : स्वातंत्र्यादिनी कोरोनाची आलेली आकडेवारी नगरकरांची धडकी भरणारी ठरली आहे. काल सायंकाळपासून ते आज सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालात 609 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ९ हजार ५०५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.८६ टक्के आहे. सध्या विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार २११ इतकी झाली आहे.

सध्या जिल्ह्यात १२ हजार ८६९ कोरोना बाधित आढळले असून, आतापर्यंत 153 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४२, अँटीजेन चाचणीत २०७ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर २२३, संगमनेर १, पाथर्डी १, नगर तालुका ४, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट ४, अकोले १, शेवगाव १, मिलीटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०७ जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी १३, श्रीरामपुर १७, नेवासे २१, श्रीगोंदा ९, पारनेर ११, अकोले १५ राहुरी ७, शेवगाव १७,  कोपरगाव १८, जामखेड १३ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये महापालिका ८९, संगमनेर १२, राहाता ४, पाथर्डी १, नगर तालुका २६, श्रीरामपुर ४, नेवासे २, श्रीगोंदे १, पारनेर ४, अकोले ३, राहुरी २ कोपरगाव १, जामखेड ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख