श्रीरामपूरमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर, दररोज केवळ 90 रुग्णांची तपासणी - Corona's condition is critical in Shrirampur, with only 90 patients being examined daily | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर, दररोज केवळ 90 रुग्णांची तपासणी

गाैरव साळुंके
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

श्रीरामपूर तालुक्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरासह ग्रामीण भागात आजपर्यंत एक हजार ७८९ नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

श्रीरामपूर : तालुक्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरासह ग्रामीण भागात आजपर्यंत एक हजार ७८९ नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपचारानंतर एक हजार ५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर कोरोनामुळे ५१ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. सध्या १८६ अॅक्टिव रुग्णांवर उपाचार सुरु आहे. तसेच १९७ रुग्णांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन दररोज सरासरी ९० रुग्णांची कोरोना तपासणी केली जाते. शिरसगाव येथील डाॅ. आंबेडकर वस्तीगृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केद्रांसह डाॅ. विखेपाटील फौंडेशनतर्फे येथील बेलापूर रस्त्यावरील विखे पाटील संपर्क कार्यलयात खासगी तपासणी केंद्रामध्ये कोरोना तपासणी केली जाते.

तालक्यात सध्या दहा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण गंभीर अवस्थेत असून, त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहे. प्रशासनाने प्रारंभी येथील संतलुक रुग्णालयात कोरोना उपचार विभाग सुरु केला. त्यानंतर शिसरगाव येथील डाॅ. आंबेडकर वस्तीगृहासह ग्रामीण रुग्णालयात कोरोना उपचार सुविधा वाढविल्या. सध्या ग्रामीण रुग्णालयात २८ रुग्ण, तर डाॅ. आंबेडकर वस्तीगृहात ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. दहा गंभीर रुग्णावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तालुक्यात आजपर्यंत ५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नोंदणीकृत मृत रुग्ण वगळता कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेली चार ते पाच रुग्णांचा तपासणी पुर्वीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यात एकुण चार हजार ६७८ नागरीकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात चार हजार २९ रुग्णांची रॅपीड तपासणी तर ६४८ रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. 

आरोग्य विभागाने रॅपीड तपासणीवर अधिक भर दिला आहे. रॅपीड तपासणीत एक हजार ९४ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. तर शासकीय आणि खासगी प्रयोग शाळेत पाठविलेल्या घशातील स्त्रावाच्या तपासणीत ६१५ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आले. शहरातील साई शितल खासगी कोविड रुग्णालयासह शासकीय परवाणगी नसलेल्या आणखी दोन कोविड रुग्णालयात १०० रुग्णांवर उपचार सुरु आहे. 

शासकीय उपचार विभागात ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर खासगी रुग्णालयात १०० रुग्णांवर उपचार सुरु आहे. येथील संतलुक रुग्णालयातुन शेकडो रुग्ण उपचारानंतर बरे होवुन घरी परतले. परंतू शासकीय निधीअभावी संतलुक रुग्णालय बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली. रुग्णांवर उपचार करताना संतलुकचे अनेक कर्मचारी कोरोना पॅझिटिव्ह झाले. सद्या संतलुक रुग्णालयात नव्याने रुग्ण दाखल करुन घेण्याची प्रक्रीया निधीअभावी थांबली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील डाॅ. आंबेडकर वस्तीगृहातील १२५ खाटांसह ग्रामीण रुग्णालयातील ५० खाटांच्या कोविड विभागात केवळ ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर शहरातील खासगी रुग्णालयांत १०० रुग्णांवर उपचार सुरु आहे. 

शहरात सध्या तीन खासगी कोविड रुग्णालयात सुरु आहे. अद्याप दोन रुग्णालयांना शासकीय परवानगी मिळालेली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. केवळ साई शितल कोविड रुग्णालयास शासकीय परवाणगी मिळालेली आहे. तर आणखी दोन रुग्णालयात विनापरवाना सुरु आहे. त्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. खासगी कोविड रुग्णालयांची नियमित तपासणी होणे गरजेचे असून, रुग्णांची होणारी आर्थिक लूट नियंत्रणात ठेवण्याची सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. परंतू सार्वजनिक आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरीकांतुन होत आहे. 

शहरातील प्रभाग एक परिसरासह ग्रामीण भागातील बेलापूर परिसरात सर्वाधिक कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ टाकळीभान परिसरात रुग्ण आढळुन आले. परंतू टाकळीभान येथील रुग्णसंख्या काही अंशी मंदावली आहे. तालुक्यातील १६ गावांनी आजपर्यंत कोरोना संसर्गापासुन रोखले आहे. तर ४० गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्य सरकारच्या `माझे कुटूंब- माझी जबाबदारी` मोहीमे अंतर्गत तालुक्यातील २० टक्के नागरीकांची आरोग्य तपासणी झाली आहे. उर्वरीत ८० टक्के रुग्णांसह सर्व नागरीकांची २५ आॅक्टोबरपर्यंत दोन वेळा प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहे. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख