नगर जिल्ह्यात कोरोनाचे 598 बळी, शहरात लाॅकडाऊनची चर्चा रेंगाळली - Corona's 598 victims in the city, talk of a lockdown lingering in the city | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात कोरोनाचे 598 बळी, शहरात लाॅकडाऊनची चर्चा रेंगाळली

मुरलीधर कराळे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात काल ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे.

नगर  : जिल्ह्यात कोरोनाचे 598 बळी झाले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 854 झाली आहे. त्यामध्ये नगर शहरात जोरदार कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहेत. ग्रामीण भागातही वेगाने पसरतो आहे. असे असले, तरी शहरात लाॅकडाऊनची केवळ चर्चाच रंगली. नंतर मात्र ही चर्चाही थंडावली आहे.  

जिल्ह्यात काल ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. काल रूग्णसंख्येत ७३९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६८५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९५ आणि अँटीजेन चाचणीत २५६ रुग्ण बाधीत आढळले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९,  संगमनेर १, पाथर्डी १, नेवासा ३, श्रीगोंदा २, पारनेर ३, अकोले २, राहुरी ६, शेवगाव २६, जामखेड १ आणि मिलिटरी हॉस्पिटल ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३९५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १५१, संगमनेर ६, राहाता ४०, पाथर्डी १३, नगर ग्रामीण ४८, श्रीरामपुर २२, कॅंटोन्मेंट १, नेवासा २५, श्रीगोंदा ८, पारनेर २०, अकोले १, राहुरी ३३, शेवगाव ७, कोपरगाव ८, जामखेड ५ आणि कर्जत७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २५६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ४४, संगमनेर ३०, राहाता ९, नगर ग्रामीण ११,  श्रीरामपूर २८, नेवासे २९, श्रीगोंदा १०, पारनेर ९, राहुरी १०, कोपरगाव २४, जामखेड ३१ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णाची संख्या जास्त होत असली, तरी शहरात लाॅकडाऊन होत नसल्याने शहरात नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहे. लाॅकडाऊनसाठी नागरिक सज्ज आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही लाॅकडाऊनबाबत स्थानिक नेत्यांनी ठरवावे, असे सांगून ही जबाबदारी महापाैर व आमदार यांच्यावर सोपविली आहे. तथापि, त्यांच्यातही एकमत होत नसल्याने लाॅकडाऊन रेंगाळत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख