विखे पाटील साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी केंद्र - Corona test center for employees at Vikhe Patil Sugar Factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

विखे पाटील साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी केंद्र

रविंद्र काकडे
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संघ कार्यरत आहे. रोज २५० ते ३०० कामगारांची टेस्ट घेतली जाणार आहे.

लोणी : कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामाची सुरूवात लवकरच होणार आहे. त्यादृष्टीने प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट केंद्राची आज सूरुवात करण्यात आली.

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. विळद घाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या सहकार्याने या टेस्ट करण्यात येणार आहेत. अवघ्या काही दिवसात सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरूवात होणार आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून पुर्व नियोजन सुरू आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला.

कोरोना संकटाच्या काळात विखे पाटील परिवाराने सामाजिक बांधिलकी ठेवून आरोग्याचे विविध उपक्रम राबवून जागृकता निर्माण केली. गळीत हंगाम सुरू होणार असल्याने कारखान्यातील कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना स्वतःला आणि व्यवस्थापनाला माहीती असावी, या उद्देशाने हा उपक्रम घेतला असल्याचे आमदार विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संघ कार्यरत आहे. रोज २५० ते ३०० कामगारांची टेस्ट घेतली जाणार असून, येणाऱ्या अहवालानुसार कामगारांना आरोग्याच्या संदर्भात पुढील मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

 

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख