कोरोना परिस्थितीमुळे शांत, याचा अर्थ राजकारण सोडून दिले असे नाही - Corona is quiet, it doesn't mean he has given up politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोना परिस्थितीमुळे शांत, याचा अर्थ राजकारण सोडून दिले असे नाही

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

मी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो, म्हणजे मी अता पुन्हा राजकारणात येणार नाही. राजकारण सोडून देणार, असा काहींचा गैरसमज झाला असेल, तर तो चुकीचा आहे.

पारनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मी स्वतःच्या व सामाजाच्या हितासाठी काही काळ राजकारणात शांत झालो आहे. तालुक्यात जास्त फिरत नाही, याचा अर्थ मी राजकारण सोडून दिले, असा होत नाही. या पुढेही मी राजकारणात सक्रीयच राहाणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या माझे राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष असून, कोण काय करतो व कोठे जातो, याचा अभ्यास करीत आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यानी केले.

पारनेर येथे शिवसेनेच्यावतीने सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला. त्या वेळी औटी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे होते. या प्रसंगी जिल्हापरीषदेचे कृषी व बांधकम समितीचे सभापती काशिनाथ दाते, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले, नगराध्यक्ष  वर्षा नगरे आदी उपस्थित होते. 

औटी म्हणाले, की मी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो, म्हणजे मी अता पुन्हा राजकारणात येणार नाही. राजकारण सोडून देणार, असा काहींचा गैरसमज झाला असेल, तर तो चुकीचा आहे. या पुढील काळातही मी राजकारणात सक्रीयच राहाणार आहे. तालुक्यात आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसह पारनेर नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुका सुद्धा आम्हीच जिंकाणार आहोत. आता हे सांगण्याची गरज नाही. आगामी काळात जनता व आमचे कार्यकर्ते हे दाखवून देणार आहेत. आजही दररोज माझ्या कार्यालयात अनेक कार्यकर्ते माझ्याकडे भेट घेण्यास येत आहे. आल्यावर ते  आपल्या मनातील खंत व्यक्त करत  आहेत. 

सध्या कोरोनाचे संकट आहे, या संकटात पक्ष किंवा गटतट विसरून काम केले पाहिजे. आज आम्ही सदस्य नोंदणीला पारनेर शहरापासून सुरूवात केली आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांसह तालुकाभर दौरे करून जनतेशी संवाद साधणार आहे. आज कोरोनाच्या संकटामुळे ठराविक मोजक्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले आहे. आमची संघटना आजही मजबूत आहे व या पुढेही राहाणार आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष गाडे म्हणाले, आज तालुक्यात सुरू केलेल्या सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळला आहे. पुढेही तालुकाभर सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. शिवसेनेचे तालुक्यातील काम चांगले आहे. पक्षाच्यावतीने सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर, तर अतिशय आदर्श आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख