नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढले 511, साडेतीन हजार रुग्णांवर उपचार सुरू - Corona patients in the town increased to 511, three and a half thousand undergoing treatment | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढले 511, साडेतीन हजार रुग्णांवर उपचार सुरू

मुरलीधर कराळे
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 21 हजार 710 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 371 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण 25 हजार 613 रुग्णांची नोंद झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आज ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. काल रूग्ण संख्येत ५११ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४७२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५७, अँटीजेन चाचणीत २५७ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, संगमनेर १, राहाता १, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर २, कॅंटोन्मेंट १, नेवासे ०६, श्रीगोंदे ३, पारनेर ३, अकोले १७, शेवगाव ५१, कोपरगाव १, जामखेड २, कर्जत १ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६८, राहाता १४ , नगर ग्रामीण २४, श्रीगोंदे १८, पारनेर १७, अकोले ५, राहुरी १५, शेवगाव २३, कोपरगाव ३५, जामखेड १७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३२, संगमनेर २०, राहाता ५, नगर ग्रामीण ६, श्रीरामपुर १८, नेवासे ३, श्रीगोंदा १,  पारनेर २, अकोले ४, राहुरी १, शेवगाव १,  कोपरगांव ३, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल ६३८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 21 हजार 710 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 371 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण 25 हजार 613 रुग्णांची नोंद झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख