नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी आता 50 हजारांचा टप्पा ओलांडला असून, काल दिवसभरात 545 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्ण 50 हजार 223 झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांनीही 45 हजारांचा टप्पा ओलांडला असून, आता बरे झालेले एकूण रुग्ण 45 हजार 382 झाले आहेत. सध्या 4 हजार 54 रुग्णांवर उपचार सुरू असून, 787 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे.
जिल्ह्यात काल ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६९ आणि अँटीजेन चाचणीत २४९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५८, अकोले १९, जामखेड ३, कोपरगाव १, नगर ग्रामीण १०, पारनेर ४, पाथर्डी २, राहुरी १, शेवगाव ८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट २, मिलिटरी हॉस्पिटल ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५१, अकोले ७, कोपरगाव २, नगर ग्रामीण १७,, नेवासा १३, पारनेर ५, पाथर्डी ५, राहाता २३, राहुरी ९, संगमनेर २९, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत काल २४९ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा १३, अकोले १९, जामखेड २०, कर्जत २०, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १, नेवासे १७, पारनेर ५, पाथर्डी ४५, राहाता १९, संगमनेर ४७, शेवगाव ११, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

