नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण 40 हजारांच्या उंबरठ्यावर, दिवसभरात 900 बाधित - Corona patients in Nagar district on the threshold of 40 thousand, 900 infected in a day | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण 40 हजारांच्या उंबरठ्यावर, दिवसभरात 900 बाधित

मुरलीधर कराळे
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात रोज 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांचा आकडा पार करणार आहे. काल नव्याने 900 रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्ण संख्या 38 हजार 159 झाली आहे.

नगर : जिल्ह्यात रोज 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांचा आकडा पार करणार आहे. काल नव्याने 900 रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्ण संख्या 38 हजार 159 झाली आहे. तसेच काल दिवसभरात 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 632 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ९०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार १४६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ४२, पाथर्डी ९, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २, नेवासे ५, श्रीगोंदे ६, पारनेर ३, राहुरी ३, कोपरगाव ३ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४०, संगमनेर १४, राहाता १९, पाथर्डी ६, नगर ग्रामीण २९, श्रीरामपुर ३४, नेवासा ११, श्रीगोंदे २, पारनेर २३, अकोले ३, राहुरी २२, शेवगाव ३, कोपरगाव १० आणि जामखेड ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६०० जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा १६२, संगमनेर ४४, राहाता ५१, पाथर्डी ५२, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदे १६, पारनेर ३१, अकोले ३१, राहुरी २३, शेवगाव १०, कोपरगाव ३९, जामखेड ३१, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख