अशोक कारखान्याच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू - Corona kills Ashok factory official | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक कारखान्याच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

गाैरव साळुंके
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

कारखान्याच्या विविध विभागाच्या दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी म्हणुन पुढील काही दिवस कारखाना विभाग बंद ठेवण्याची मागणी सभासदांसह कामगारांतून होत आहे. 

श्रीरामपूर : सामान्य नागरीकांसह विविध क्षेत्रातील नागरीकांना सध्या कोरोनाचा संसर्ग होत आहे. पोलिस, डाॅक्टर, कैदी, सरकारी कर्मचारी, निम-सरकारी कर्मचारी, खासगी बॅकासह आता सहकार क्षेत्रालाही कोरोचा संसर्ग झाल्याचे दिसुन येते. आज पहाटे येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे उपचारादरम्यान, नगर येथे मृत्यु झाला.

यापुर्वी कारखान्याच्या विविध विभागाच्या दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी म्हणुन पुढील काही दिवस कारखाना विभाग बंद ठेवण्याची मागणी सभासदांसह कामगारांतून होत आहे. 

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संर्सग झपाट्याने वाढला आहे. काल (ता.4) तब्बल 43 नव्या रुग्णांची वाढ झाली. तालुक्यात सध्या कोरोनामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. श्रीरामपूर तालुक्यात कोरोनामुळे मागील काही 25 हुन अधिक रुग्णांचा बळी गेला. तर 900 हुन अधिक नागरीकांना कोरोनाची बाधा झाली. चार महिन्यापुर्वी तालुक्यात बाहेरुन प्रवास करुन आलेले नागरीक कोरोना पाॅझिटिव्ह आढळत होते. त्यानंतर प्रवाश्यांच्या संपर्कातील नागरीक कोरोनाबाधित झाले. परंतू दोन महिन्यांपासुन स्थानिक नागरीकांमध्ये कोरोनाचा संर्सग झाल्याचे दिसत होते. 

तालुक्यात आतापर्यंत प्रवाश्यांसह, त्यांचे कुंटूब, कैदी, पोलिस, लोकप्रतिनीधी, राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, खासगी व सरकारी वैद्यकीय अधिकारी, बॅक कर्मचारी, हमालासह शेकडो महिला व पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला. तपासणी नंतर ते पाॅझिटिव्ह रुग्णांना प्रारंभी नगर तर सध्या येथील संतलुक रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जातात. तपासणीसाठी डाॅ. आंबेडकर वस्तीगृहात व्यवस्था केली आहे. उपचारानंतर बहुतांश रुग्ण अल्पावधीत बरे होवुन सुखरुप घरी परततात. परंतू कोरोनासह विविध आजार असल्याने रुग्णांची प्रकृती खालावते आणी मृत्यूचे दार उघडते. अनेकांना चांगले उपचार न मिळाल्याने त्यांचे मृत्यू झाले.

संसर्गाची साखळी तोडण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश आले आहे. शहरात अनेक ठिकाणी गर्दी कायम आहे. बॅका, सरकारी, निम-शासकीय कार्यालयात दिवसभर वर्दळ असते. अनेक नागरीक विनामास्कचे रस्त्यावर फिरतात. तबांखु, गुटखा खावुन रस्त्यावर थुंकतात. त्यामुळे संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका वाढतो. वाहतुक पोलिसांसह शहर पोलिस रस्त्यावर नियमांचे उल्लघंन केलेल्या वाहतुकीवर कारवाई करतात. तसेच चौका-चौकात घोळका करुन उभे असलेल्या तरुणांना पोलिस खाक्या दाखवितात. परंतू कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांमध्ये प्रबोधन करण्यात स्थानिक प्रशासनासह पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसते.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख