मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाने कोरोनादूत सुदाम जाधव हरकले - Corona envoy Sudam Jadhav's resignation from the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाने कोरोनादूत सुदाम जाधव हरकले

मुरलीधर कराळे
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत.

नगर : आपले काम त्यांनी चोख केले. त्यातून आपले एव्हढे काैतुक होईल, असे वाटले नव्हते. मात्र थेट मुख्यमंत्र्यांनीच काैतुकाची थाप टाकल्याने बोटा (ता. संगमनेर) येथील सुदाम जाधव हरकून गेले आहेत. मनापासून केलेल्या कामाचे फळ नक्कीच मिळते, हे त्यांच्या काैतुकावरून दिसून आले. 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आज त्यांनी नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यात नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पथकात कार्यरत आरोग्य कर्मचारी सुदाम जाधव यांच्या संवेदनशीलतेचे त्यांनी कौतुक केले. ज्येष्ठ महिलेला वेळेवर दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार सुरू करण्यासाठी जाधव यांनी पुढाकार घेतला होता.

सुदाम जाधव हे आरोग्य कर्मचारी बोटा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या पथकाला या केंद्राचे प्रमुख डॉ. कापसे यांनी अकलापुर येथील सर्वेक्षणाचे काम दिले होते. या वेळी त्यांना या गावातील एक ६८ वर्षीय महिलेला ताप सर्दी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवले. जाधव यांनी तपासणी केली असता या महिलेची ऑक्सिजन लेवल  ७८ टक्के आढळून आली. तात्काळ त्यांनी डॉ. कापसे यांना संपर्क केला. त्यानंतर या महिलेला उपचार करून त्यांची चाचणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी त्यांना कोविड हेल्थ सेंटर संगमनेर येथे संदर्भित करण्यात आले. त्यांचा अहवाल पॉजीटिव्ह आला. तात्काळ उपचार सुरू झाल्याने आज त्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत. सुदाम जाधव यांनी योग्य वेळी निर्णय घेतल्याने या ज्येष्ठ महिलेला तात्काळ उपचार मिळू शकले.

जाधव यांच्या या संवेदनशीलतेबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी कौतुक केले. या मोहिमेत काम करणारे सर्व कोरोनादुत अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख