Corona effect! Her dream of getting married became her 'time' | Sarkarnama

कोरोना इफेक्ट ! तिचं वाजत-गाजत लग्नाचं स्वप्न ठरलं तिचा `काळ`

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

पळशी येथील ऋतुजा हिचे नुकतेच लग्न जमले होते. मात्र, हे लग्न मोठ्या धुमधडाक्‍यात, वाजत-गाजत करावे, अशी ऋतुजाची इच्छा होती. ही इच्छा तिने आईजवळ व्यक्तही केली. मात्र, त्यास आईने नकार दिला.

पारनेर : वाजत-गाजत, मोठ्या धुमधडाक्‍यात लग्न करून देण्यास आईने नकार दिल्याच्या रागातून पळशी येथील मुलीने घराजवळील झाडाला गळफास घेऊन काल (बुधवारी) आत्महत्या केली. ऋतुजा माधव काळे असे मृत मुलीचे नाव आहे. 

पळशी येथील ऋतुजा हिचे नुकतेच लग्न जमले होते. मात्र, हे लग्न मोठ्या धुमधडाक्‍यात, वाजत-गाजत करावे, अशी ऋतुजाची इच्छा होती. ही इच्छा तिने आईजवळ व्यक्तही केली. मात्र, त्यास आईने नकार दिला. त्यातून माय-लेकीमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून संतापलेल्या ऋतुजा हिने बुधवारी (ता. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. नंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत नातेवाइकांनी आमची काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा...

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांचे विलगीकरण करा 

नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधित सापडणे बंद झाले असून, जिल्ह्याबाहेरून येणारेच आता सापडू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या प्रत्येकाला गावपातळीवर ग्रामसुरक्षा समितीने कटाक्षाने विलगीकरण करून ठेवावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी केली आहे. 
आरोग्य समितीची सभा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्या वेळी ही सूचना करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व पाणीशुद्धीकरण, तसेच पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. मलेरिया, डेंगी, चिकुनगुन्या आदी आजारांच्या बाबतीत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असेही आरोग्य विभागाला या वेळी सूचित करण्यात आले. कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी. कामात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी सभेत दिला. सभेला जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पंचशीला गिरमकर, कविता लहारे, सविता अडसुरे, पुष्पा वराळ, रामभाऊ साळवे, सोमनाथ पाचरणे, नंदा गाढे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख