कोरोना दिलासा ! रोजची रुग्णसंख्या निम्म्यावर - Corona consolation! Daily patient halves | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

कोरोना दिलासा ! रोजची रुग्णसंख्या निम्म्यावर

मुरलीधर कराळे
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे.

नगर : जिल्ह्यात आज गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. यापूर्वी 800 च्या वर असलेली रुग्णसंख्या आता 400 पर्यंत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज रुग्ण 400 च्या दरम्यान आढळत आहेत. आज जिल्ह्यात 452 रुग्णांची भर पडली.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ६८८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७१ आणि अँटीजेन चाचणीत ३०६ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, कर्जत १, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ६, नेवासे ५, पारनेर ४, पाथर्डी ६, राहाता १, राहुरी ५, श्रीगोंदा ४, मिलिटरी हॉस्पिटल २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २०, अकोले २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ६, नेवासे ०३, पारनेर २, पाथर्डी २, राहाता १५, राहुरी १३, संगमनेर १,  श्रीरामपूर ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३०६ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा १५, अकोले १३, जामखेड ३६, कर्जत २२,  कोपरगाव १३, नगर ग्रामीण ७, नेवासा ९, पारनेर १४, पाथर्डी ३१, राहाता ५०, राहुरी ९, संगमनेर २९, शेवगाव २५, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 42 हजार 880 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 741 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 47 हजार 309 झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख