कोरोनास्फोट ! दिवसभरात आढळले 49 रुग्ण, शहरावर नियंत्रण मिळेना - Corona blast! 49 patients were found during the day, the city was out of control | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनास्फोट ! दिवसभरात आढळले 49 रुग्ण, शहरावर नियंत्रण मिळेना

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 695 झाली आहे. नगर शहर व संगमनेरसह श्रीरामपूर, पारनेर, राहाता, जामखेड आदी तालुक्यांतील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.

नगर : रात्री उशिरा आलेल्या अहवालात 24 नवीन रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात काल दिवसभरात 49 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातील नगर शहरात 21 सापडले असून, एकट्या संगमनेरमध्ये 13 रुग्ण वाढले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा हा आकडा वाढतच असून, त्यावर नियंत्रण करणे आता आवाक्याबाहेर जावू लागले असल्याचे चित्र आहे. 

या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 695 झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी प्रयोगशाळेतील अहवालांचा कालच्या रुग्णांत समावेश आहे. नगर शहर व संगमनेरसह श्रीरामपूर, पारनेर, राहाता, जामखेड आदी तालुक्यांतील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.

नगर शहरातील कवडेनगर परिसरात 3, ढवणवस्ती 1, नित्यसेवा 1, सिद्धार्थनगर 1, पुणे रोड 1, गवळीवाडा (भिंगार) 12 अशी रुग्णांची नोंद झाली आहे. जामखेड येथे 2 रुग्ण आढळून आले असून, ते पुण्याहून प्रवास करून आले होते. पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे सापडलेला एक रुग्ण मुंबईहून आलेला आहे. संगमनेर येथे 2 रुग्णांची नोंद झाल आहे. इतर तालुक्यातही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे काल एकाच दिवसी 49 रुग्ण वाढले आहेत. 

नगर तालुक्यातील गावांना धोका

नगर तालुक्यातील सर्व गावे शहराजवळ आहेत. शहरात दूध घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच भाजीपाला मोठ्या प्रमाणात शहरात पाठविला जातो. कालच्या अहवालात पिंपळगाव येथील एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे इतर गावांनाही आता धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात अजूनही पुरेसी काळजी घेतली नाज नाही. त्यामुळे गावात रुग्ण सापडू लागल्यास त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो, अशी भिती व्यक्त होत आहे.

खेड्यांतील दुकाने मोकाट

ग्रामीण भागातील दुकानांवर बंधणे लादण्याची गरज आहे. प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर देणे, पैसे घेताना व देताना सॅनिटायझरचा वापर करणे, काउंटर बाजूला ठेवणे आदी गोष्टींचे पालन करणे आवश्यक असताना ग्रामीण भागातील दुकानांमध्ये असे नियम पाळलेले दिसत नाही. त्यामुळे दुकानदारांच्या माध्यमातून कोरोनाची बाधा वाढू शकते. याबाबत प्रशासनाने कडक करावाई करण्याची गरज आहे.

फेरीवाल्यांना हवी बंदी

नगर तालुक्यातील अनेक गावांत फेरीवाले येत आहेत. ते दिवसभर बऱ्याज गावांमधून फिरत असतात. काही माल खरेदी-विक्री केली जाते. भंगारवाले भंगार घेवून लोकांना पैसे देतात. हे सर्व व्यवहार होत असताना कुठेही सॅनिटायझर वापरताना दिसत नाही. त्यामुळे असे परगावचे फेरिवाले प्रत्येक गावांनी स्वतःहून बंद केले पाहिजे. तरच कोरोनाला आळा बसू शकेल, असे ग्रामस्थांचे मत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख