नगरमधील उपलब्ध कोरोना बेड, प्रवासाचे परवाने आता एका क्लिकवर - Corona beds available in town, travel permits now at a click | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमधील उपलब्ध कोरोना बेड, प्रवासाचे परवाने आता एका क्लिकवर

मुरलीधर कराळे
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

अहमदनगर शहरातील विविध हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सची माहिती, जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेर प्रवासासाठीचे आॅनलाईन पाससाठी मिळण्यासाठी पुढील लिंक ओपण करा. http://ahmednagarcovid19.com/report/

नगर : जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रोज किमान 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाने रोज चाचण्या वाढविल्या असल्याने रुग्णसंख्याही वाढते. कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णाला चिंता असते, ती कुठल्या रुग्णालयात दाखल व्हावे. याची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था करून दिली आहे.

नगर शहरातील विविध हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सची माहिती, प्रवासासाठीचे आॅनलाईन पाससाठी पुढील लिंक ओपण करून सुविधा मिळेल. http://ahmednagarcovid19.com/report/ 

या लिंकवर हाॅस्पिटल, तेथील बेडची संख्या, रिक्त बेडची संख्या, कोविड बेड, नाॅन कोविड बेड आदी सर्व माहिती सविस्तर देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण बेडची संख्या, रुग्ण संख्या आदी माहिती असल्याने रुग्णांमध्ये गोंधळ उडणार नाही. तसेच संबंधित हाॅस्पिटलच्या नावासमोर संबंधित रुग्णालयातील मोबाईल नंबरही उपलब्ध आहे. त्यामुळे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याबरोबर रुग्ण संबंधित हाॅस्पिटलला फोन करून तेथे तातडीने दाखल होऊ शकेल, अशी सुविधा त्यामध्ये करण्यात आली आहे. या पोर्टलवर सरकारी कोविड सेंटर, खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यावर प्रिंट असलेल्या बटनाद्वारे आपण त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो.

जिल्हाबाहेर जाण्यासाठी काढा आॅनलाईन परवाना

एखाद्याला जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे असल्यास आॅनलाईन लिंक माहिती नसल्याने अनेकजण सेतू कार्यालयत जावून तेथून पास उपलब्ध करतात. तेथे जाणे, पैसे भरणे आदींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त भिती असते. त्यामुळे याच पोर्टलवर बॅक बटनाद्वारे आपण महाराष्ट्र अंतर्गत इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठीचा अर्जही आॅनलाईन उपलब्ध करू शकतो. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर जायचे असल्यास तशी परवानगी घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज याच वेबसाईटवर उपलब्ध असतो. आपल्या अर्जाचे स्टेटसही कळते. त्यामुळे कोरोनाच्या काळात ही लिंक प्रत्येकाच्या मोबाईलवर सेव्ह होऊ लागली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख