काॅंग्रेस सदस्य रुसले ! श्रीरामपूर पंचायत समिती इमारतीच्या 5 कोटींचे श्रेय कोणाचे? - Congressman Rusley! Who owns Rs 5 crore for Shrirampur Panchayat Samiti building? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

काॅंग्रेस सदस्य रुसले ! श्रीरामपूर पंचायत समिती इमारतीच्या 5 कोटींचे श्रेय कोणाचे?

गाैरव साळुंके
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

विरोधी काॅंग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, यासंदर्भात सांयकाळी उशिरा प्रसिद्ध पत्रक काढले आहेत.

श्रीरामपूर : येथील पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे भूमिपुजन उद्या (ता. 22) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार असले, तरी काॅंग्रेस सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने हा कार्यक्रम वादाच्या विळख्यात सापडला आहे.

पंचायत समितीच्या येथील नुतन इमारतीसाठी पाच कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, इमारतीचे भुमिपूजन राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते आणि माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे सभापती संगिता शिंदे आणि उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी काॅंग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, यासंदर्भात सांयकाळी उशिरा प्रसिद्ध पत्रक काढले आहेत. येथील पंचायत समितीच्या कार्यालयाला राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेमार्फत निधी मंजूर झाला. नुतन इमारतीच्या भुमिपूजन सोहळ्याला भाजपाचे आमदार कशी उपस्थिती लावणार, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व जनहितांचे निर्णय घेतले जात आहे. राज्याच्या धर्तीवर नगर जिल्हा परिषदेत तीनही पक्षांनी एकत्र येवून अध्यक्षपदी राजश्री घुले यांची निवड केली. त्यामुळे घुले यांनी अल्पावधीतच आपल्या विकास कामाचा ठसा उमटला आहे. अशी परिस्थिती असताना भाजपात नुकत्याच दाखल झालेल्या काही नेतेमंडळी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नेहमी टीका करीत असतात.

एकीकडे राज्य सरकारवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर टीका करायची आणि दुसरीकडे शासकीय विकास कामांचा प्रारंभ करायचा, असा दुहेरी खेळ जनता ओळखुन आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे सदस्य भूमिपुजन सोहळ्याला अनुउपस्थित राहुन बहिष्कार टाकणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा दिघे, मंगल पवार, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, डाॅ. वंदना मुरकुटे, विजय शिंदे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

दोनवेळा भूमिपूजन पुढे ढकलले

श्रीरामपूर पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा यापूर्वी दोनवेळा विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर उद्या आयोजित केलेल्या भूमिपूजन सोहळा प्रशासकीय प्रोटोकॉलनुसार नसल्याचे समजते. महिन्यापूर्वी भूमिपूजन सोहळ्याचे नियोजन केले होते. परंतु ही माहिती जिल्हा परिषदेला न कळविल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच उद्याच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख