संबंधित लेख


मंगळवेढा (जि. सोलापूर) ः एका मताची किंमत काय असते, याचा अनुभव नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थोडक्यात मताने पराभूत झालेले आणि...
बुधवार, 20 जानेवारी 2021
राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये,मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज जाहीर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्वागत करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले, की राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये,मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. फळपीक नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये, रस्ते आणि पुलांसाठी 2 हजार 635 कोटी, ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी 1 हजार कोटी, नगर विकासासाठी 300 कोटी, महावितरण उर्जा विभागासाठी 239 कोटी, जलसंपदा विभागासाठी 102 कोटी रुपये, कृषी, शेती, घरांसाठी 5 हजार 500 कोटी रुपये असे एकूण 9 हजार 776 कोटी रुपयांचे हे मदत पॅकेज आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मोठी मदत होणार आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक अजूनही आलेले नाही. कोरोनामुळे राज्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. केंद्र सरकारकडून हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीतही शेतकर्याला वार्यावर न सोडता ही भरीव मदत राज्य सरकारने जाहीर केली असून, दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. संकटकाळात राज्यसरकार शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.