काॅंग्रेसला हवीय महापालिकेची सत्ता, थोरातांकडून कार्येकर्ते `चार्ज` - Congress wants municipal power, activists 'charge' from Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेसला हवीय महापालिकेची सत्ता, थोरातांकडून कार्येकर्ते `चार्ज`

मुरलीधर कराळे
रविवार, 28 मार्च 2021

कॉंग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा कॉंग्रेसचा शाश्‍वत विचार आहे. नगर शहरात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून, कॉंग्रेसची घोडदौड चांगली सुरू आहे.

नगर : राष्ट्रवादीच्या सहकार्याने भाजपने सत्ता मिळवित महापालिकेवर कमळ फुलविले. त्यातून काॅंग्रेसला अलिप्त राहण्याची वेळ आली. संघटनच अपुरे पडले. राज्यात सत्ता असल्याने काॅंग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले, आणि आता महापालिकेवर पंजा मारण्यासाठी पक्षसंघटना सरसावली आहे. काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्ते `चार्ज` करून आगामा महापाैर आपलाच, असे सुतोवाच केले.

शहर जिल्हा काॅंग्रेसची आढावा बैठक काल नगरमध्ये झाले. मंत्री थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष किरण काळे यांनी बैठकिचे चोख नियोजन केले. थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

महापाैर काॅंग्रेसचाच हवा

या वेळी थोरात म्हणाले, की "कॉंग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा कॉंग्रेसचा शाश्‍वत विचार आहे. नगर शहरात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून, कॉंग्रेसची घोडदौड चांगली सुरू आहे. त्यामुळे शहराचा आगामी महापौर कॉंग्रेसचा होईल. संघटनात्मक फेरबदल करत असताना शहरामध्ये काळे यांच्या रूपाने नव्या दमाचा चेहरा पक्षाने दिला आहे. त्यामुळे पक्षाचे काम जोमाने सुरू आहे. विविध घटकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाच्या माध्यमातून आवश्‍यक ती सर्व ताकद काळे यांच्या पाठीशी उभी केली जाईल.``

 

हेही वाचा..

केडगाव औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची कामे मार्गी लावा

नगर : केडगाव औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आर्थिक नियोजन करा, असे सांगत राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

शहरातील उद्योजकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये झाली. त्या वेळी थोरात बोलत होते. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, केडगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सतीश बोरा, अरविंद गुंदेचा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, तसेच अनेक उद्योजक बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्‍त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार उमेश पाटील आदी उपस्थित होते. 

किरण काळे, सतीश बोरा, हनिफ शेख, प्रकाश गांधी आदींनी उद्योजकांचे प्रश्‍न मांडले. केडगाव वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पथदिव्यांचा प्रश्‍न, तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याकडे लक्ष वेधले.

मंत्री थोरात यांनी, महापालिकेचा कारभार कसा चालतो? थोडी-फारही विकासकामे होत नाहीत का, अशी विचारणा केली. खलिल सय्यद, अनंतराव गारदे, फारुख शेख, हनीफ शेख, प्रवीण गिते, अक्षय कुलट, अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख