केंद्र सरकारच्या कृषीधोरणांविरोधात नगरमध्ये काँग्रेसचा हल्लाबोल - Congress attack in the city against the central government's agricultural policies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

केंद्र सरकारच्या कृषीधोरणांविरोधात नगरमध्ये काँग्रेसचा हल्लाबोल

मुरलीधर कराळे
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

काॅंग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून नगर जिल्ह्यातही आंदोलने करण्यात आली.

नगर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात नगर जिल्ह्यात काॅंग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने केली. नगर शहरात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना काॅंग्रेसच्या मार्गदर्शनाखाली निवेदने देण्यात आले. तसेच काॅंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

काॅंग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून नगर जिल्ह्यातही आंदोलने करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली, असे काॅंग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने विनाचर्चेने लादलेले जुलमी कृषी विधेयक व कामगार विधेयक हे अत्यंत जाचक असून, हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यासाठी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये तालुका काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करीत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला. जामखेड येथे युवक काॅंग्रेसचे राहुल उगले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने विना चर्चेने देशांमध्ये लागू केलेले कृषी व कामगार विधेयके अत्यंत जाचक व सर्वसामान्यांच्या विरोधी आहे.. या काळया कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने देशभरामध्ये  तीव्र भूमिका घेतली असून, देशभरातील शेतकर्‍यांमध्ये केंद्राने लादलेल्या या कायद्याविरोधात संतापाची लाट आहे. यासाठी हरियाणा व पंजाबमध्ये शेतकर्‍यांनी मागील तीन महिन्यांपासून या कायद्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले असून, आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी एकवटले आहेत.

या शेतकर्‍यांची सन्मानाने चर्चा करण्याऐवजी भारत सरकार हुकूमशाही पद्धतीने त्यांच्यावर अश्रुधूर, नळकांडे व लाठीचार्ज करत आहे, त्याचं निंदनीय आहे. जगाच्या पोशिंदालाही अपमानास्पद वागणूक दिली जात असून, ही लोकशाहीची थट्टा आहे. म्हणून केंद्र सरकारने लागू केलेले काळे कायदे तातडीने रद्द करावेत व दिल्लीतील शेतकर्‍यांचा सन्मान करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.

संगमनेरमध्ये हल्लाबोल

बसस्थानकासमोर नवीन नगर रोड येथे संगमनेर तालुका काँग्रेस समिती व शहर काँग्रेस समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन झाले. या वेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सभापती मीरा शेटे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे आदी उपस्थित होते.

या वेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे म्हणाल्या की, भाजप सरकार हे शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधी सरकार आहे. मागील सहा वर्षाच्या जाहिरातबाजी शिवाय दुसरे काहीही केले नाही. कोणतेही विकासकाम नसणारे या सरकारने शेतकरी व कामगारांची गळचेपी करण्यासाठी नवे काळे कायदे आले आहेत. हे तातडीने रद्दद्द करावेत म्हणून देशपातळीवर सोनिया गांधी व राज्य पातळीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. देशभरातून सह्यांचे निवेदन ही राष्ट्रपती यांना देण्यात आले, मात्र तरीही केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेत आहे, या अत्यंत निंदनीय आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख