शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजारांची भरपाई द्या : अरुण मुंडे - Compensate farmers at Rs 25,000 per hectare: Arun Munde | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजारांची भरपाई द्या : अरुण मुंडे

मुरलीधर कराळे
मंगळवार, 23 मार्च 2021

जिल्ह्यातील अवकाळी व गारपीटमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांचे तातडीने पंचनामे करावेत.

नगर : मागील वर्षीचा अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असताना श्रम आणि पैसापणाला लावून शेतकरींनी भाजीपाला, फळबागा आणि रब्बीची पिके घेतली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा... गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा ः अरुण मुंडे यांची मागणी

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार तर फळबागांना हेक्‍टरी 50 हजार रुपये भरपाई आठ दिवसांमध्ये द्यावी. अन्यथा, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी दिला आहे.

हेही वाचा... निष्ठेचे फळ खरंच मिळते का

भाजपच्या वतीने नगर जिल्ह्यातील शेतकरींना अतिवृष्टी व गारपीटमुळे नुकसानग्रस्त भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिले. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, प्रसाद ढोकरीकर, कचरू चोथे, बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, रभाजी सूळ, आजिनाथ हजारे, शामराव पिपळे आदी उपस्थित होते. 

मुंडे म्हणाले की, जिल्ह्यातील अवकाळी व गारपीटमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके व भाजीपाला यांचे नुकसानभरपाई करीता हेक्‍टरी 25 हजार रुपये तर फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्‍टरी 50 हजार रुपये सरसकट अनुदान शासनाने द्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीतून सावरण्यास मदत होईल. 

माजी आमदार शिवाजीराव कर्डीले म्हणाले की, राज्यात अवकाळी पाऊस होऊन तीन-चार दिवस झाले, तरीही सरकारने पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश दिले नाही. सरकारचे सर्व लक्ष मंत्री संजय राठोड, निल देशमुख, सचिन वाझे या प्रकरणात लागले आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. 

हेही वाचा...

कोपरगावात आंदोलकांवर गुन्हा दाखल 

कोपरगाव : कोविड प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत आंदोलन केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांच्यासह 20 ते 22 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. 

शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शहरातील भाजप कार्यालयासमोर तालुकाध्यक्षसह पदाधिकाऱ्यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सामाजिक अंतर न राखता घोषणाबाजी केली. कोरोना नियमांचा भंग केला. 

शिंदे यांच्या फिर्यादीवरू तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय रूपचंद काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक रवींद्र पाठक, सत्येन मुंदडा, शिवाजी खांडेकर, अविनाश पाठक, कैलास खैरे, सुशांत खैरे, बाळासाहेब दीक्षित, सुजल चांदनशिव, गोपीनाथ गायकवाड, संजू खरोटे, रवी रोहमारे, कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर पाच ते सात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख