नगर : मागील महिन्यात 4 हजारांवर उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या गेल्या पंधरा दिवसांपासून झपाट्याने कमी झाली असून, आज केवळ दोन हजारांवर आली आहे. नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, आज केवळ 254 नवीन रुग्ण आढळले. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे.
आज जिल्हयात 351 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 50 हजार 377 झाली आहे. सध्या 2 हजार147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 53 हजार 337 झाली आहे.
कोरोना रुग्ण कमी होत असल्याने जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर बंद झाले आहेत. शहरातील दोन सेंटर बंद झाले असून, आणखीही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी सध्या तरी मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नाही. त्यासाठी जिल्ह्यात आंदोलनेही सुरू आहेत. सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही खुली करावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ६२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६ आणि अँटीजेन चाचणीत १४६ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले १, कर्जत २, कोपरगाव १, नगर ग्रामीण ५, पारनेर ७, पाथर्डी ४, राहाता ९, राहुरी ४, संगमनेर १४, श्रीरामपूर ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २७, नगर ग्रामीण ५, नेवासे १, पारनेर ३, पाथर्डी ५, राहुरी १, श्रीगोंदे ३, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १४६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५, अकोले २४, जामखेड २९, कर्जत ५, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १, नेवासे ११, पारनेर ६, पाथर्डी १९, राहाता १३, राहुरी १, संगमनेर १६, शेवगाव ३, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ७, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

