सहकारी चळवळ कुठल्या धर्माची बटिक नाही : मोदी - Co-operative movement is not a batik of any religion: Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

सहकारी चळवळ कुठल्या धर्माची बटिक नाही : मोदी

मुरलीधर कराळे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे दुःख स्वतः पाहिले. अनुभवले. सहकार वाढविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.

नगर : बाळासाहेब विखे पाटील यांनी गावातील दुःख जवळून पाहिले. अनुभव केला. त्यामुळेच शेतकऱ्यांना त्यांनी सोबत घेतले. सहकाराला जोडले. सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्याही जातीची किंवा धर्माची बटिक नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

विखे पाटील यांच्या आत्मचरित्र असलेल्या `देह वेचावा कारणी` या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हर्च्यूअल व्हिडिओ काॅन्फरन्सीने उपस्थित होते. लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्तविक केले.

मोदी म्हणाले, की सहकार निःपक्ष असतो. `देह वेचवा कारणी` या नावात मोठा अर्थ आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की शेतीत काैशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मनात हा प्रश्न उगीच नाही आला. त्यामागे मोठा त्याग आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे दुःख स्वतः पाहिले. अनुभवले. सहकार वाढविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. नगर जिल्ह्यात ऊसाचे मोठे उत्पादन होते. शेतीची क्रांती, दुधाची क्रांती गुजरातमध्ये झाली. गहू हरिणाना, पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला. हेच माॅडेल देशाला पुढे घेऊन जाणार आहे, असे मोदी यांनी सांगून सहकार क्षेत्राचा गाैरव केला.

खासदार डाॅ. सूजय विखे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख