नगर : राज्यातील मंदिरे उघण्यासाठी खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्रींना पत्र लिहावे लागते यापेक्षा दुर्दैव्य काय? असा सवाल करीत माजी पणन मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी करीत धार्मिक स्थळे बंद ठेवणे, ही राज्य सरकारची विकृती आहे, असा टोला राज्य सरकारला लगावला.
भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली. गांधी परिवाराच्या वतीने पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी सरोज गांधी, देवेंद्र गांधी, अनिल डागा, रोषण गांधी, सागर गोरे, लक्ष्मण बोठे आदी उपस्थित होते.
म्हणाले, की तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेले नाही. कोणाचाच कोणावर नियंत्रण राहिलेला नसल्याने सरकार वाचवण्यात सर्व मग्न आहेत. जनतेच्या प्रश्नांशी मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकाऱ्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे भाजपाने राज्यात आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्न मांडत आहे. दिलीप गांधी यांच्यासारखे मतदारसंघाचा विकास करणारे व्यक्तिमत्व संसदेत पाहिजे होते, असेही ते म्हणाले.
दिलीप गांधी म्हणाले, की हर्षवर्धन पाटील व माझी जुनी मैत्री आहे. भाजपच्या व आघाडीच्याही सरकारमध्ये त्यांची मंत्रीपदाची कारकीर्द उत्कृठ ठरली आहे. त्यांचे नगरमध्ये स्वागत करतांना आनंद होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतेक भाजपचे नेते नगरहून जाताना दिलीप गांधी यांच्या घरी येतात. त्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांपेक्षा गांधी यांचे भाजपमधील वजन कायम असल्याचे दिसून येते.

