नगर अनलाॅक, पण `शनिकृपा` झालीच नाही

फक्त पाच व्यक्तींच्या उपस्थितीत आरती सोहळा होईल. अन्य सर्व कार्यक्रम होणार नाही.
Shanidev.jpg
Shanidev.jpg

सोनई : शनिशिंगणापुर (Shani Shingnapur) येथील आज (ता. 10) शनिजयंती महोत्सव शासनाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, आलेल्या भाविकास कुठल्याही स्थितीत मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली आहे. (The city is unlocked, but not "Saturn")

कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर सर्व व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी धार्मिक स्थळ उघडण्यास शासनाची परवानगी नसल्याने शनिजयंती महोत्सव निमित्तची कावड मिरवणूक, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, कीर्तन सोहळा, महाप्रसादसह जत्रा रद्द करण्यात आली आहे. फक्त पाच व्यक्तींच्या उपस्थितीत आरती सोहळा होईल. अन्य सर्व कार्यक्रम होणार नाही.

दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने भाविकांनी शनिशिंगणापुरला येवू नये, असे आवाहन देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, सरपंच बाळासाहेब बानकर व सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे. आवाहन करुनही भाविक आलेच, तर त्याकरीता विशेष बंदोबस्त म्हणून देवस्थान सुरक्षा विभाग व पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे.

हेही वाचा..

जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य विभागची झाडाझडती

राहुरी : येथे जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यात, अनेक त्रुटी आढळल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली. कामचुकार, हलगर्जीपणा करणारे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरत कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या समवेत आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार पूनम दंडीले, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड उपस्थित होते.

तत्पूर्वी, जिल्हाधिकारी भोसले यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालय व शासनाच्या बालाजी मंदिरातील कोविड केअर सेंटरला अचानक भेट दिली. त्यामुळे डॉक्टर व अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. जिल्ह्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती व अस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले.
 

हेही वाचा...

Edited By - Murliehar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com