नगरमध्ये आज वाढले 899 कोरोना रुग्ण, ओलांडला 25 हजारांचा टप्पा - The city today saw an increase of 899 corona patients, crossing the 25,000 mark | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

नगरमध्ये आज वाढले 899 कोरोना रुग्ण, ओलांडला 25 हजारांचा टप्पा

मुरलीधर कराळे
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात आज 899 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६०६ इतकी झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आज 899 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६०६ इतकी झाली आहे.

आज ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३४, अँटीजेन चाचणीत ३८० आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ५३, संगमनेर ९६, पाथर्डी ४, श्रीगोंदा २०, अकोले ३, राहुरी २२, शेवगाव १, कोपरगाव १०, जामखेड ४, मिलिटरी हॉस्पिटल २० आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३८० जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ६१, संगमनेर १४, राहाता ४२, पाथर्डी ३३, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ७, नेवासे ३९, श्रीगोंदा २६, पारनेर १७, अकोले २४, राहुरी १८, शेवगाव ११, कोपरगाव ३३, जामखेड १८ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, महापालिका १३९, संगमनेर ११, राहाता १८, पाथर्डी ६, नगर ग्रामीण ३७, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा ९, श्रीगोंदा ३, पारनेर ९, अकोले ७, राहुरी १४, शेवगाव ५,  कोपरगांव ५, जामखेड ३ आणि कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या २१ हजार १३२ झाली असून, सध्या 3 हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 364 मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या 25 हजार 102 झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख