नगर शहरात काॅंग्रेसमध्ये गटबाजी करणारांना आमदार डाॅ. तांबे यांचे इंजेक्शन - In the city, MLA Dr. Congress factionalism. Injection of copper | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नगर शहरात काॅंग्रेसमध्ये गटबाजी करणारांना आमदार डाॅ. तांबे यांचे इंजेक्शन

मुरलीधर कराळे
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

नगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने कामगार, शेतकरी कायद्याविरोधात आयोजित सह्यांच्या मोहिमेचा प्रारंभ आमदार तांबे यांच्या उपस्थितीत झाला. 

नगर : किरण काळे हेच अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्त्यांना नगर शहरामध्ये काम करावे लागेल. गटबाजी करणाऱ्यांनी सुधारणा केली नाही, तर त्यांच्यावरती पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली. 

नगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने कामगार, शेतकरी कायद्याविरोधात आयोजित सह्यांच्या मोहिमेचा प्रारंभ आमदार तांबे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस कार्यालय झाला. या वेळी ते बोलत होते.

या वेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दानिश शेख आदींसह काँग्रेस पक्षाचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

आ. तांबे म्हणाले की, नगर शहरामध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे. किरण काळे हे अत्यंत चांगले, धाडसी आणि हुशार नेतृत्व आहे. त्यांच्यावर आम्ही शहराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. किरण काळे हे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. काळे हाच काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट आहे. बाकी इतर कोणतेही गट पक्षाला अजिबात मान्य नाहीत. पक्ष बळकट करत असताना आणि स्थिर करत असताना जर काही मंडळी तो होऊ देतच नसतील, तर असं करणाऱ्यांची भूमिका ही चुकीचे आहे. चांगल्या पद्धतीने वागले, तर संधीचा विचार आम्ही करू. पक्षाला कार्यकर्ते हवे असतात. मात्र त्यांना पक्षाला नगर शहरामध्ये स्थिर होऊ द्यायचं नसेल, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशा कठोर शब्दांमध्ये आ. तांबे यांनी गटबाजी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. 

काळे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब 

आमदार तांबे यांनी नगर शहरामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे किरण काळे हेच काँग्रेस पक्षाचे नगर शहराचे नेते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करावे लागेल. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या स्पष्ट आणि कठोर भूमिकेमुळे काळे यांच्या नेतृत्वात वर पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करत त्यांना बळ दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख