नगरमध्ये नवीन 403 रुग्ण, सोमवारपासून या कारणाने आणखी वाढ दिसणार - The city has seen an increase of 403 patients, a further increase due to this from Monday | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये नवीन 403 रुग्ण, सोमवारपासून या कारणाने आणखी वाढ दिसणार

मुरलीधर कराळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रुग्णसंख्या वाढली म्हणून लोकांनी घाबरून जावू नये. काही लक्षणे दिसून येत असल्यास तातडीने रुग्णालयात संपर्क करून तपासणी करून घ्यावी.

नगर : जिल्ह्यात आज 403 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना तपासण्यांत वाढ केली असल्याने आकडेवारीही वाढू लागली आहे. आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जनतेशी सोशल मीडियावर संवाद साधून उद्यापासून आणखी तपासण्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्यापासून रुग्णसंख्येत अधिक वाढ दिसू शकेल.

जिल्ह्यात आज वाढलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७१ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३ हजार ७६२ इतकी झाली. अँटीजेन चाचणीत आज १९५  जण बाधित आढळुन आले. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १५१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. आज एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या 3 हजार 762 आहे. सध्या 2 हजार 71 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 5 हजार 911 रुग्ण आहेत.

जिल्ह्याधिकाऱ्यांचा जनतेशी संवाद

दरम्यान, आज जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जनतेशी फेसबूकवरून संवाद साधला. लोकांचे प्रश्न ऐकून घेवून त्याला उत्तरे दिली. उद्यापासून चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढलेली दिसेल. प्रत्यक्षात नागरिकांमध्ये अनेक रुग्ण दडलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे काम प्रशासन करीत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली म्हणून लोकांनी घाबरून जावू नये. काही लक्षणे दिसून येत असल्यास तातडीने रुग्णालयात संपर्क करून तपासणी करून घ्यावी. लवकर उपचार केले, तर कोरोना पूर्णपणे बरा होता. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन त्यांनी आज केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख