नगरचा बिहार झाला ! काॅंग्रेस होणार आक्रमक - The city became Bihar! Congress will be aggressive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

नगरचा बिहार झाला ! काॅंग्रेस होणार आक्रमक

मुरलीधर कराळे
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

गेल्या सहा - सात वर्षांपासून नगर शहरातील अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भळगट कुटुंबीयांसोबत घडलेल्या घटनेमुळे नगर शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

नगर : शहराचा पुन्हा एकदा बिहार झाला आहे. ही मालिका थांबायला तयार नाही. प्रतिष्ठित व्यापारी असणाऱ्या भळगट कुटुंबीयांना शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बड्या नेत्याचा राजकीय वरदहस्त असणाऱ्या सराईत गुंडांकडून दिवसा घरात घुसत घरातील पुरुषांसह स्त्रियांना झालेली मारहाण ही नगर शहरवासीयांसाठी अत्यंत लांछनास्पद आणि संतापजनक असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.

काळे यांनी काल रात्री उशिरा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह भळगट कुटुंबीयांची त्यांच्या निवस्थानी समक्ष भेट घेत व्यथा जाणून घेतली. या वेळी सुनील भळगट, सुशीलकुमार भळगट, शुभम भळगट यांनी घटनेची माहिती दिली.

याबाबत काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली असून, व्यापाऱ्यांनी भयभीत होऊ नये, असे आवाहन केले आहे. आपण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची समक्ष भेट घेणार असून, नगर शहरातील राजकीय वरदहस्ताने चालणाऱ्या गुंडगिरीचा समूळ नायनाट करण्यासाठी भूमिका मांडणार असल्याचे काळे यांनी सांगितले. 

काळे म्हणाले की, गेल्या सहा - सात वर्षांपासून नगर शहरातील अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भळगट कुटुंबीयांसोबत घडलेल्या घटनेमुळे नगर शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भळगट कुटुंबीयांवर आलेला हा प्रसंग शहरातील इतर कोणत्याही व्यापाऱ्यांवर येऊ शकतो. किंबहुना तो अनेकांवर आलेला देखील आहे. परंतु दहशतीमुळे त्यांनी आवाज न उठवता तडजोड करत अन्याय सहन केला आहे. मात्र या संघटित भूमाफियांच्या विरुद्ध समाजाने देखील संघटितपणे आवाज उठविला पाहिजे. शहरातील व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक यांच्या पाठीशी शहर काँग्रेस भक्कमपणे उभी राहील.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख